Bengaluru Crime : बेंगळूरू : कर्नाटकमध्ये (karnatak) एका घरमालकाने (landlord) भाडोत्री महिलेकडे शरीर सुखाची (physical relationship) मागणी केली आहे. इतकेच नाही तर या घरमालकाने महिलेला गिफ्टमधून (birthday gift) अंतरवस्त्र (innerwear) दिली होती. घरमालकाने आपल्याला घरात कोंडून बाहेर कुलुप लावल्याचा आरोपही महिलेने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी घरमालकाला अटक (arrest) केली आहे. तर आपल्यावर खोटे आरोप (false allegation) करण्यात आल्याचे घरमालकाने म्हटले आहे. (landlord send innerwear to female teacher ask for physical relationship bengluru)
दक्षिण बेंगळूरूमधील (south bengluru) श्रीनगरमध्ये एक महिला शिक्षिका गेली १२ वर्षी एका भाड्याच्या घरात राहत होती. परंतु तिचा घरमालक पद्मनाभ तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत होता. पद्मनाभने तिला मेसेज करून बाहेर भेटण्यासही सांगितले होते. परंतु महिलेने या सगळ्यांना साफ नकार दिला होता. त्यानंतरही पद्मनाभ ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. महिलेच्या वाढदिवसाला पद्मनाभ एक गिफ्ट दिले होते. महिलेला वाटले साधारण गिफ्ट असेल, परंतु पद्मनाभने तिला अंतरवस्त्र गिफ्ट केले होते. त्यानंतर महिलेच्या डोक्यातील आग मस्तकात गेली. तिने तत्काळ पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. तसेच ११ जानेवारी रोजी पद्मनाभ महिलेच्या घराबाहेर आला आणि कुलूप लावून गेला असा आरोपही महिलेने केला आहे.
तर दुसरीकडे आरोपी पद्मनाभने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. आपण महिलेला घर रिकामं करण्यास सांगितले होते, परंतु तिने नकार दिला, त्यामुळेच महिलेने आपल्यावर खोटी तक्रार केल्याचे आरोपी पद्मनाभमने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून महिला आणि घरमालक पद्मनाभमध्ये घरावरून वाद सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या पोलिसांनी आरोपी पद्मनाभविरोधात भारतीय दंड संहिता ४४१, ५०४ आणि ३५४)(१)(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस दोन्ही बाजूने तपास करत असून आरोप सिद्ध झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले आहे.