Laptop Overheat Issue : तुम्हीही मांडीवर लॅपटॉप ठेवून काम करता? मग ही बातमी वाचाच

बर्‍याच वेळेला आपण मांडीवर लॅपटॉप ठेवून काम करत असतो. हीच सवय एका तरुणीला महाग पडली आहे. लॅपटॉपचा स्फोट झाला असून या आगीत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

laptop blast
लॅपटॉप स्फोट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बर्‍याच वेळेला आपण मांडीवर लॅपटॉप ठेवून काम करत असतो.
  • हीच सवय एका तरुणीला महाग पडली आहे.
  • लॅपटॉपचा स्फोट झाला असून या आगीत तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

Laptop overheat : अमरावती : बर्‍याच वेळेला आपण मांडीवर लॅपटॉप ठेवून काम करत असतो. हीच सवय एका तरुणीला महाग पडली आहे. लॅपटॉपचा स्फोट झाला असून या आगीत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अमरावतीच्या मेकावरिपल्ली गावात राहणारी २३ वर्षीय इंजिनीअर तरुणीने सुमलता ही कोरोनामुळे घरून काम करत होती. सुमलता मांडीवर लॅपटॉप ठेवून काम करत होती. तेव्हा लॅपटॉपचा भीषण स्फोट झाला. संपूर्ण घरात धुर झाला. स्फोटाचा आवाज ऐकताच सुमलताच्या आई वडिलांनी बेडरुमकडे धाव घेतली. तेव्हा बेडरुममध्ये सुमलता भाजलेल्या अवस्थेत बेशुद्ध पडली होती. तेव्हा तिला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिक रुग्णालयात तिची तब्येत खालावल्यानंतर तिला तिरुपती जवळ एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

जेव्हा लॅपटॉपचा स्फोट झाला तेव्हा तत्काळ आपण घराचा वीजपुरवठा बंद केला अशी माहिती सुमलताचे वडील सुब्बा रेड्डी यांनी दिली. घरातील शॉट सर्किटमुळे लॅपटॉपचा स्फोट झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तर लॅपटॉप जास्त गरम झाल्याने त्याचा स्फोट झाला असावा असा अंदाज सुमलताच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.  लॅपटॉपच्या या स्फोटात सुमलता ८० टक्के भाजली आहे. तिची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. 


लॅपटॉपच्या चार्जिंग पोर्टचा प्रॉब्लेम असल्यास किंवा शॉटर सर्किटमुळे लॅपटॉपचा स्फोटो होतो. तसेच लॅपटचा अतिवापर केल्यास लॅपटॉप ओवरहीट होतो. लॅपटॉप ओवरहीट होऊ नये म्हणून त्यात पंखे लावले जातात. अनेकवेळेला या पंख्यातील वेंट बंद होतात आणि व्हेंटिलशन होत नाही आणि लॅपटॉप ओवरहीट होतो. अशा वेळी लॅपटॉप वापराताना त्याखाली पॅड ठेवणे गरजेचे आहे. लॅपटॉप ओवरहीट होऊ नये म्हणून काही वेळ लॅपटॉप बंद करावा. तसेच लॅपटॉप ओवरहीट होऊ नये यासाठी फॅन असलेले टेबल्सही बाजारात उपलब्ध आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी