Drugs seized in Gujarat :  गुजरातमध्ये  १२० कोटींचा ड्रग्जचा मोठा साठा जप्त, एटीएसची कारवाई

Drugs seized in Gujarat : अहमदाबाद : गुजरातमधील (Gujarat) द्वारकामध्ये एटीएसकडून (ATS)झालेल्या मोठ्या कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे.

Large stock of drugs seized in Gujarat again 120 crore worth of property seized action taken by ATS
गुजरातमध्ये  १२० कोटींचा ड्रग्जचा मोठा साठा जप्त 
थोडं पण कामाचं
  • गुजरातमधील (Gujarat) द्वारकामध्ये एटीएसकडून (ATS)झालेल्या मोठ्या कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे.
  • या ड्रग्जची बाजारातील किंमत १२० कोटी रुपये आहे.
  • या प्रकरणी एटीएसने तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

Drugs seized in Gujarat : अहमदाबाद : गुजरातमधील (Gujarat) द्वारकामध्ये एटीएसकडून (ATS)झालेल्या मोठ्या कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे.  द्वारकामधील (Dwarka)नवाद्रा गावात एका घरातून २४ किलोचे ड्रग्ज (Drugs ) जप्त करण्यात आले आहेत. (Large stock of drugs seized in Gujarat again 120 crore worth of property seized action taken by ATS)

या ड्रग्जची बाजारातील किंमत १२० कोटी रुपये आहे. या प्रकरणी एटीएसने तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

नुकतेच गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील एका गावातून एटीएसने १२० किलो ड्रग्ज जप्त केले होते. त्याचा बाजारभाव सुमारे ६०० कोटी रुपयांच्या आसपास होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसच्या हाती काही धागेदोरे लागले आणि त्यांनी आज कारवाई करून मोठे यश संपादन केले आहे.  या प्रकरणाचे धागेदोरे पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रापर्यंत जात असल्याचा दावा एटीएसकडून करण्यात आला आहे. 

पंजाबच्या फरिदाकोट तुरुंगात असलेला भूषण शर्मा उर्फ भोला शूटर तुरुंगातूनच ड्रग्जचे रॅकेट चालवत असल्याची माहिती आरोपींनी दिल्याचे एटीएसकडून सांगण्यात आले आहे. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या नवलखी बंदराजवळ असलेल्या जिनजुदा गावाजवळून जवळपास १२० किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. यानंतर तिघांना अटक करण्यात आली. एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई पूर्ण केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी