या देशात खातात सगळ्यात लांब चपाती !

लोकल ते ग्लोबल
Updated Mar 17, 2023 | 15:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

लवाश ही जगातली सर्वात लांब आणि पातळ चपाती आहे, जी आर्मेनिया भागात कैक काळापासून बनवली जाते. जगभरातील लोकांना चकित करणाऱ्या या चपातीचा आकार इतका मोठा आहे कि,  यूनेस्को ने देखील या चपातीला कल्चरल हेरीटेज लिस्टमध्ये समाविष्ट केले आहे.  या चपातीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तिथल्या देशाच्या  संस्कृति आणि अनेक परंपरेशी ती जोडली गेली आहे. 

largest roti of the world lavash
आर्मेनियाचे रहिवासी जगातली सर्वात मोठी चपाती (लवाश) खातात  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ८ तवा चपात्या बनतील इतकी मोठी चपाती
  • ही चपाती खाण्यासाठी वर्षभर जतन करु शकतात, मध्य पूर्व देशात प्रचलित
  • ८ तवा रोटी बनतील इतकी मोठी चपाती, आर्मेनिया देशाची देणगी !

largest roti of the world lavash : आर्मेनियाचे रहिवासी जगातली सर्वात मोठी चपाती (लवाश) खातात, लांबलचक आकार असणाऱ्या या चपातीला तंदूर मध्ये शिजवले जाते. तंदूर झालेली ही रोटी त्यानंतर घडी घालून  ठेवली जाते, आणि वाढली जाते. आपल्या तव्यावरच्या जवळपास ८ चपात्या या एका रोटीमध्ये बनतील असा विशाल आकार लावश चा आहे. अशी ही जगातली सर्वात मोठी  चपाती आर्मेनियाची देण असून, यूनेस्को ने देखील तिच्या नावीन्यतेची दखल घेतली आहे. केवळ आर्मेनियाच नव्हे तर अजरबिजान, इराण आणि तुर्कीमध्ये ही ती बनवली जाते. 

हे पण वाचा एक वर्षात PAK बर्बाद! कांदा 157 रुपये किलो, डिझेल 281 रुपये लीटर


ही चपाती बनवण्याची पद्धत रुमाली रोटीसारखी आहे. फक्त ही चपाती आकाराने आणि लांबीने मोठी आहे. ही चपाती खाण्यास पातळ आणि मऊ असते. यूनेस्को ने आपल्या कल्चरल लिस्टमध्ये या आगळ्यावेगळ्या चपाती साठी आर्मेनिया देशाला बहुमान दिला तेव्हा अजरबिजान, इराण, किरगिस्तान आणि कजाकीस्तान मध्ये यावरून विरोध झाला. लावश ही केवळ आर्मेनियाची देण नसून ती क्षेत्रीय देण आहे असे त्यांचे म्हणणे होते.

हे पण वाचा Mumbai Metro 3: मुंबई- डिसेंबर २०२३ पर्यंत ‘मेट्रो ३’ मुंबईकरांच्या सेवेत दाखल !

असे असले तरी लवाश चे मूळ आर्मेनिया देशातच सापडले आहे, काही फूड हिस्टॉरियन च्या मते या चपातीची उत्पत्ति इराण मध्ये झाली असावी, किंवा मध्य पूर्व कोणत्या तरी देशात हा पदार्थ सर्वप्रथम बनला असावा असे म्हंटले जाते.

 
लावश पीठ, पानी, ईस्ट, मीठ आणि साखरे पासून बनविले जाते. काही भागात साखर आणि ईस्ट शिवाय देखील लावश बनविण्यात येते. काही ठिकाणी लावश च्या पिठात तीळ आणि अफीम च्या बिया टाकल्या जातात, त्यांतर ते पीठ लाटून घेऊन दोन्ही हाताने पासरवले जाते. असे हे लावश पुढे तंदूर मध्ये भाजले जाते. इराण, तुर्की सारख्या इतर मध्य पूर्व देशांमध्ये लावश कबाब सोबत खाल्ले जाते. काही देशात गोड पदार्थासोबत देखील लावश खातात. या चपाती पासून विविध डिश बनविण्यात येते.  

 हे पण वाचा Army Helicopter Crash: बेपत्ता 'चित्ता' हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले, दोन्ही पायलटचा शोध सुरू

ज्याप्रकारे आपल्या देशाची संस्कृती आणि परंपरा अन्न ध्यान आणि खाद्य पदार्थासोबत जुळल्या आहेत, अगदी तसेच ककाश देशामध्ये देखील आहे. जेव्हा अजरबिजान ची नववधू लग्न होऊन आपल्या नव्या घरी जाते, तेव्हा तिची सासू तिच्या खांद्यावर लवाश ठेवते आणि ‘तू या घरामध्ये समृद्धी घेऊन ये, तुझ्या पावलांनी या घराचे भाग्य उजळून निघो’ असे म्हणते.  या देशात लवाश जेवण बांधून ठेवण्यासाठी पण वापरतात.      

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी