जम्मूमध्ये पकडलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी निघाला भाजपा IT सेलचा प्रमुख

जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) लष्कर ए तोयबाच्या (Lashkar-e-Toiba) दोन दहशतवाद्यांना (Terrorists) गावकऱ्यांनी पडकलं असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि एके-४७ बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान पकडल्या गेलेल्या दहशतवाद्यामुळे भाजपची (BJP) चिंता वाढणार आहे.

BJP's IT cell chief Lashkar-e-Toiba terrorist
भाजपचा आयटी सेलचा प्रमुख लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भाजपचा आयटी सेल प्रमुख निघाला दहशतवादी
  • जम्मूच्या रियासी गावात पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव तालिब हुसैन शाह असं आहे.

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) लष्कर ए तोयबाच्या (Lashkar-e-Toiba) दोन दहशतवाद्यांना (Terrorists) गावकऱ्यांनी पडकलं असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि एके-४७ बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान पकडल्या गेलेल्या दहशतवाद्यामुळे भाजपची (BJP) चिंता वाढणार आहे. या दहशतवाद्याचं नाव तालिब हुसैन शाह असं आहे. त्याला ९ मे २०२२ रोजी भाजपाने लेटरहेड जारी करत जम्मू विभागाचा भाजपाचा आयटी सेल प्रमुख बनवलं होतं. एवढंच नव्हे तर, दहशतवादी तालिब हुसैन शाहचे जम्मू-काश्मीर भाजपाचे अध्यक्ष रवींद्र रैना यांच्यासह अनेक वरिष्ठ भाजपा नेत्यांसोबतचे फोटोही समोर आले आहेत. 

जम्मूच्या रियासी भागात हे दहशतवादी लपून बसले होते, येथील गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. या दहशतवाद्याकडून दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान शाह यांच्या नियुक्तीच्या वेळी जम्मू आणि काश्मीरच्या भाजपा अल्पसंख्याक आघाडीने एक आदेश जारी केला होता. संबंधित आदेशात म्हटलं की, “श्री तालिब हुसैन शाह यांची तातडीने राजोरी जिल्ह्याच्या द्रज कोटरांका, बुढानचे नवीन आयटी सेल प्रमुख आणि सोशल मीडिया प्रभारी म्हणून नियुक्ती केली जात आहे.”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी तालिब हुसैन शाह हा पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी कासिमच्या संपर्कात होता. अलीकडच्या काळात राजौरी जिल्ह्यात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तीन घटनांमध्ये त्याचा सहभाग होता. याशिवाय नागरिकांच्या हत्या आणि ग्रेनेड स्फोट घडवण्यात देखील त्याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर भाजपाचे प्रवक्ते आरएस पठानिया यांनी स्पष्टीकरण देत सारवासारव केली. ते म्हणाले की, “ऑनलाइन पद्धतीने सदस्यत्व दिल्याने हा प्रकार घडला आहे. अशाप्रकारे सदस्यत्व देताना संबंधित सदस्याची पार्श्वभूमी तपासली जात नाही, त्याला थेट सदस्यत्व दिलं जातं. त्यामुळे भाजपात कुणीही प्रवेश करू शकतो.” हे भाजपाविरुद्धचे षडयंत्र असल्याचंही पठानिया म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी