Jammu Kashmir : अभिनेत्री अमरिनची हत्या करणारे २ दहशतवादी ठार, ३ दिवसांत १० दहशतवादी ठार

Lashkar terrorists who killed Kashmiri TV actor Amreen Bhat Killed in encounter in Soura area of Srinagar : जम्मू काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये लष्कर ए तोयबा संघटनेचे चार दहशतवादी ठार झाले. सुरक्षा पथकांनी जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांत दहा दहशतवादी ठार केले.

Lashkar terrorists who killed Kashmiri TV actor Amreen Bhat Killed in encounter in Soura area of Srinagar
Jammu Kashmir : अभिनेत्री अमरिनची हत्या करणारे २ दहशतवादी ठार, ३ दिवसांत १० दहशतवादी ठार 
थोडं पण कामाचं
  • Jammu Kashmir : अभिनेत्री अमरिनची हत्या करणारे २ दहशतवादी ठार, ३ दिवसांत १० दहशतवादी ठार
  • सौरा येथे दोन दहशतवादी रात्री झालेल्या चकमकीत ठार
  • अवंतीपोरा येथे ठार झालेल्या दहशतवाद्यांनी अभिनेत्री अमरिन हिची हत्या केली होती

Lashkar terrorists who killed Kashmiri TV actor Amreen Bhat Killed in encounter in Soura area of Srinagar : श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये लष्कर ए तोयबा संघटनेचे चार दहशतवादी ठार झाले. सुरक्षा पथकांनी जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांत दहा दहशतवादी ठार केले. अवंतीपोरा आणि श्रीनगरमधील सौरा येथे प्रत्येकी दोन दहशतवादी ठार झाले. अवंतीपोरा येथे ठार झालेल्या दहशतवाद्यांनी अभिनेत्री अमरिन हिची हत्या केली होती. अभिनेत्रीवर दहशतवाद्यांनी जेव्हा गोळीबार केला तेव्हा तिच्यासोबत तिचा एक दहा वर्षांचा नातलग होता. हा मुलगा जखमी झाला. 

काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी श्रीनगरमधील सौरा येथे दोन दहशतवादी रात्री झालेल्या चकमकीत ठार झाल्याचे सांगितले. सौरा येथे लष्कर ए तोयबा संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले. या दहशतवाद्यांकडून एक एके ४७ आणि एक पिस्तुल जप्त करण्यात आले. सौरा येथे ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावं अनुक्रमे शाकिर अहमद वाजा आणि आफरिन आफताब मलिक अशी आहेत. अवंतीपोरा येथे पण लष्कर ए तोयबा संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले. याच दोन दहशतवाद्यांनी अभिनेत्री अमरिन हिची हत्या केली होती. अवंतीपोरा येथे ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावं अनुक्रमे शाहिद मुश्ताक भट आणि फरहान हबीब अशी आहेत. लष्कर ए तोयबा संघटनेचा स्वयंघोषीत कमांडर लतीफ याच्या आदेशावरून शाहिद मुश्ताक भट आणि फरहान हबीब या दोघांनी अभिनेत्री अमरिन हिची हत्या केली होती. भट आणि हबीबकडून सुरक्षा पथकाने एक एके ५६ रायफल, चार मॅगझिन, एक पिस्तुल जप्त केले. 

स्थानिक दहशतवाद्यांची संख्या कमी झाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये विदेशी दहशतवादी हिंसक कारवाया करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरक्षा पथके दहशतवाद्यांना ठार करून त्यांच्या योजना उधळून लावत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी