Launch of Rupay in Nepal to enhance financial connectivity : नवी दिल्ली : नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा भारत दौऱ्यावर आहेत. आज (शनिवार २ एप्रिल २०२२) हिंदू नवसंवत्सराच्या पहिल्या दिवशी अर्थात गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दिल्लीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेर बहादुर देउबा यांनी संयुक्तपणे नेपाळसाठी रुपे कार्ड लाँच केले. आता नेपाळमध्येही भारताचे रुपे कार्ड चालणार आहे. यामुळे भारत आणि नेपाळ यांच्यात आर्थिक व्यवहारांचा नवा राजमार्ग खुला झाला आहे.
रुपे कार्ड ही आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असलेल्या भारताची स्वदेशी कार्ड पेमेंट सिस्टिम आहे. रुपे अंतर्गत क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड, स्टोअर व्हॅल्यू कार्ड, डिजिटल कार्ड, भारत क्यूआर हे सर्व प्रकार उपलब्ध आहेत. रुपे कार्ड भारत, नेपाळ, सिंगापूर, भूतान, मालदीव, सौदी अरेबिया, संयुक्त अरब आमिरात, बहारिन, म्यानमार, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया या देशांमध्ये चालते.
शेर बहादुर देउबा नेपाळचे पंतप्रधान, संसदेत बहुमत सिद्ध