Lawrence Bishnoi: डी कंपनीसारखा बिश्नोई गँगला मुंबईत सुरू करायचा होता खंडणीचा धंदा - महाराष्ट्र गृह मंत्रालयाचा खुलासा

बॉलिवूडचा (Bollywood) भाईजान सलमान खानला (Salman Khan) धमकीचे पत्र (Threatening letter) मिळाल्याप्रकरणी महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने मोठा खुलासा केला आहे. लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) मुंबई (Mumbai) मध्ये भीतीचे वातावरम तयार करत डी कंपनीप्रमाणे (D Company) वसुलीचा धंदा (Recovery Business) सुरू करायच्या विचारात होती, असा खुलासा महाराष्ट्र गृहमंत्रालयाने केला आहे.

The Bishnoi Gang wanted to start a ransom business in Mumbai
बिश्नोई गँगला मुंबईत सुरू करायचा होता खंडणीचा धंदा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सलीम खान मॉर्निंग वॉकला निघाले तेव्हा त्यांना धमकीचे पत्र देण्यात आले होते.
  • मुंबईतील बडे व्यावसायिक आणि बॉलिवूड कलाकारांना धमकावून पैसे उकळण्याच्या तयारीत होती लॉरेन्स बिश्नोई गँग
  • मूसेवालाच्या हत्येनंतर बिश्नोईने सलमान खान आणि त्याच्या वडिलांना धमकीचे पत्र पाठवले

Recovery Business in Mumbai:मुंबई :  बॉलिवूडचा (Bollywood) भाईजान सलमान खानला (Salman Khan) धमकीचे पत्र (Threatening letter) मिळाल्याप्रकरणी महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने मोठा खुलासा केला आहे. लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) मुंबई (Mumbai) मध्ये भीतीचे वातावरम तयार करत डी कंपनीप्रमाणे (D Company) वसुलीचा धंदा (Recovery Business) सुरू करायच्या विचारात होती, असा खुलासा महाराष्ट्र गृहमंत्रालयाने केला आहे. महाराष्ट्राच्या गृहविभागातील सूत्रांनी सांगितले की, सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमक्या देण्यामागे बिष्णोई टोळीचा कट होता, जेणेकरून त्याला आपल्या शक्तीची जाणीव करून देऊन भीतीचे वातावरण निर्माण करायचे होते. सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतरच बिश्नोई टोळी प्रसिद्धीच्या झोतात आली. मूसेवालाच्या हत्येनंतर बिश्नोईने सलमान खान आणि त्याच्या वडिलांना धमकीचे पत्र पाठवले होते.

हे कृत्य केल्यानंतर ते मुंबईतील बडे व्यावसायिक आणि बॉलिवूड कलाकारांना धमकावून पैसे उकळण्याच्या तयारीत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, मुंबई पोलीस अद्यापही या प्रकरणाचा तळापर्यंत तपास करत आहे. तसेच हे पत्र तिथे कोण सोडून गेले आहे, त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

राजस्थानच्या तिघांपैकी एकाने एक पत्र सोडले

क्राइम ब्रँचचे डीसीपी संग्रामसिंग निशानदार यांनी पुण्याला जाऊ सौरव उर्फ ​​महाकाळची चौकशी केली. तर परत पुन्हा त्यांची टीम पुण्याला जाऊन जाधवची चौकशी करणार आहे. क्राइम ब्रँचच्या सूत्रांनी सांगितले की, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या कामासाठी राजस्थानमधील जालोर परिसरातून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या तिघांमधून एकाने सलीम खान यांना हे धमकीचे पत्र पाठवले होते. याशिवाय क्राइम ब्रँच अजूनही 200 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करत आहे. तपासासाठी पथके राजस्थान, पालघर आणि दिल्ली येथे जा- ये करत आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण

रविवारी सकाळी जेव्हा सलमान खानचे वडील सलीम खान मॉर्निंग वॉकला निघाले तेव्हा हे संपूर्ण प्रकरण समोर आले. दौऱ्यानंतर सलीम खान यांना एक अनोळखी पत्र मिळाले, ज्यामध्ये त्यांना आणि सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर सलीम खान यांनी आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला आणि याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी