उइगर मुस्लिमांवर अत्याचार करणाऱ्या चीनच्या विरोधात वकिलांनी कंबर कसली, आयसीसीला घातली साद

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 11, 2021 | 10:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

वकिलांच्या एका पथकाने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात अभियोजकांच्या साक्षींचा एक दस्तावेज सादर केला आहे आणि म्हटले आहे की जागतिक न्यायालयाने उइगर मुस्लिमांवर चीनमध्ये होत असलेल्या अत्याचारांचा तपास करावा.

Uyghur Mulism in China
उइगर मुस्लिमांवर अत्याचार करणाऱ्या चीनच्या विरोधात वकिलांनी कंबर कसली, आयसीसीला घातली साद  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वकिलांनी कसली कंबर
  • ताजिकिस्तानमध्ये थेट हस्तक्षेप केल्याचा चीनवर आरोप
  • उइगर मुस्लिमांना राष्ट्रीय धोका मानतो चीन

बीजिंग -  उइगर मुस्लिमांवर (Uyghur Muslims) अत्याचार (atrocities) करत असलेल्या चीनच्या (China) विरोधात जगभरातून (world) उठाव (uprising) होत आहे. वकिलांच्या (lawyers) एका समूहाने (group) आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात (International Criminal Court) अभियोजकांच्या (prosecution) साक्षींचा (statements) एक दस्तावेज (dossier) सादर केला आहे आणि म्हटले आहे की जागतिक न्यायालयाने उइगर मुस्लिमांवर चीनमध्ये होत असलेल्या अत्याचारांचा तपास (investigation) करावा. त्यांनी म्हटले आहे की या पुराव्यांनी (proofs) हे सिद्ध होते की जागतिक न्यायालय चीनवर होत असलेल्या उइगर मुस्लिमांवर अत्याचार केल्याच्या या आरोपांचा तपास करू शकते.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वकिलांनी कसली कंबर

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वकिलांच्या समूहाने चीनच्या उइगर मुस्लिमांविरोधातल्या अत्याचारांवर हेगमधल्या न्यायालयाकडे तपास करण्याची विनंती केली आहे. चीन या न्यायालयाचा सदस्य नाही. वकिलांनी म्हटले आहे की त्यांच्या दस्तऐवजावरून हेच सिद्ध होते की चीनमध्ये उइगर मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे. चीनकडून त्यांना बंदी बनवण्यात येत आहे आणि ताजिकिस्तानमधून चीनच्या पश्चिमेकडच्या भागात त्यांचे प्रत्यार्पण केले जात आहे.

ताजिकिस्तानमध्ये थेट हस्तक्षेप केल्याचा चीनवर आरोप

वकिलांच्या या समूहाचा युक्तिवाद असा होता की चीनच्या अधिकाऱ्यांनी ताजिकिस्तानमध्ये थेट हस्तक्षेप केला आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाकडे या आरोपांवर सुनावणी करण्याचा अधिकार आहे. वकिलांनी आयसीसीकडे अधिक विलंब न करता आरोपांचा तपास करण्याची विनंती केली आहे. त्यांनी म्हटले आहे की त्यांचा अहवाल हा आयसीसीचा सदस्य असलेल्या ताजिकिस्तानसह वेगवेगळ्या देशांच्या साक्षीदारांच्या साक्षी आणि तपासावर आधारित आहे.

उइगर मुस्लिमांना राष्ट्रीय धोका मानतो चीन

एका संशोधनात असे म्हटले होते की चीन राष्ट्रीय मुस्लिमांकडे राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका म्हणून पाहतो आणि या कारणाने या लोकांची संथ कत्तल इथे सुरू आहे. चायना स्टडीजच्या एड्रियन जेंज आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी कायद्याचे तज्ञ आणि वकील एरिन रोसेनबर्ग यांनी लिहिले आहे की उइगर मुस्लिमांमधला जन्मदर रोखून चीन या लोकांचा नरसंहार करत आहे. जगातील कमीत कमी पाच देशांचे सरकारही याबाबत सहमत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी