Lebanon Crisis : मध्य-पूर्वेच्या 'पॅरिस'मध्ये आर्थिक संकट; लेबनन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

लोकल ते ग्लोबल
Updated Mar 18, 2023 | 17:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Economic Crisis: जगातील अनेक देशांप्रमाणेच, मध्यपूर्वेचे 'पॅरिस' म्हणून ओळखला जाणारा देश लेबनॉन सध्या आर्थिक संकटाचा बळी पडला आहे. या देशाची सध्याची आर्थिक स्थिती हळूहळू बिकट होत चालली आहे. चलनाच्या किमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. देशाच्या चलनाचे मूल्य 90 टक्क्यांनी घसरले आहे.

Lebanon Crisis what is the reason for Economic crisis in Lebanon
Lebanon Crisis : मध्य-पूर्वेच्या 'पॅरिस'मध्ये आर्थिक संकट  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • लेबनॉनचा वाईट काळ कसा सुरू झाला?
  • लेबनॉन उध्वस्त होण्याच्या मार्गावर का आहे?
  • भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवस्थापन

Lebanon Economy Collapse: एकीकडे पाकिस्तानची आर्थिक स्थिती सतत बिघडत चालली आहे, त्याच दरम्यान आणखी एका मुस्लिम बहुल देशाची परिस्थिती काही अशीच झाली आहे. हा देश पश्चिम आशियामध्ये आहे. इथली आर्थिक स्थिती इतकी बिकट आहे की इथल्या चलनात 1 अमेरिकन डॉलरची किंमत 1 लाखाच्या पुढे गेली आहे. पश्चिम आशियातील या देशात सध्या महागाई शिगेला पोहोचली आहे.  देशाच्या काळजीवाहू सरकारच्या विरोधात येथील जनतेमध्ये प्रचंड रोष दिसून येत आहे. याबाबत अनेकदा निदर्शनेही झाली आहेत. नुकतेच असे एक चित्र समोर आले आहे ज्यात आंदोलक आपल्या देशाचे चलन आगीत जाळताना दिसत आहेत. निषेध करण्याची ही विचित्र पद्धत त्यांनी अवलंबली आहे. हा कोणता देश आहे आणि इथल्या लोकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे ते आपण जाणून घेऊया.

भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवस्थापन

जगातील अनेक देशांप्रमाणेच, मध्यपूर्वेचे 'पॅरिस' म्हणून ओळखला जाणारा देश लेबनॉन सध्या आर्थिक संकटाचा बळी पडला आहे. या देशाची सध्याची आर्थिक स्थिती हळूहळू बिकट होत चालली आहे. चलनाच्या किमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. देशाच्या चलनाचे मूल्य 90 टक्क्यांनी घसरले आहे. महागाई गगनाला भिडत आहे  आणि लोकांच्या समस्या आणखी वाढत आहेत. लेबनॉनच्या आर्थिक संकटाची तीव्रता वाढण्यामागील प्रमुख कारण म्हणजे भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवस्थापन असल्याचे मानले जात आहे.

लेबनॉनमध्ये सध्या कोणतेही स्थायी सरकार नाही या देशाची जबाबदारी सध्या काळजीवाहू सरकारवर आहे. लेबनॉनमधील या परिस्थितीसाठी आंदोलक राजकीय गटाला जबाबदार धरत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या जानेवारीपर्यंत लेबनीज पौंडचे मूल्य 1 अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 60 हजार होते, जे आता 1 लाखांहून अधिक झाले आहे.

अधिक वाचा: China-Pak । चीन आणि PAK सोबत भारताचा तणाव वाढू शकतो, अमेरिकेच्या गुप्तचरांचा गौप्यस्फोट

गंभीर आर्थिक संकटाच्या काळात, लेबनॉनमधील बँकांनी खात्यातून पैसे काढण्यास बंदी घातली आहे. यामुळे लेबनीज लोक संतप्त झाले असून त्यांनी पुन्हा निदर्शने सुरू केली आहेत. आंदोलक बँकांबाहेर निदर्शने करत आहेत. 

लेबनॉनच्या बिघडलेल्या आर्थिक स्थिती दरम्यान औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक लोकांना गरिबीत जगावे लागत आहे. मोठ्या संख्येने लोकांचे स्थलांतरही सुरू झाले आहे. चांगल्या भविष्याच्या शोधात येथिल नागरीक परदेशात जात आहेत. युरोपमध्ये निर्वासित होत आहेत.

अधिक वाचा: Same Sex Marriage: समलिंगी विवाहांसाठी केंद्राचा नकार; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

विशेष म्हणजे, लेबनॉनमध्ये खाण्यापिण्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. महागाईने जनता हैराण आहे आणि लेबनीज पौंड विक्रमी नीचांकी पातळीवर गेल्याने लेबनीज लोकांची परिस्थिती आणखी बिकट होत आहे. दुसरीकडे, बँक लोकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढू देत नाही. दरम्यान, लोकांची निदर्शने सुरूच आहेत.

लेबनॉन उध्वस्त होण्याच्या मार्गावर का आहे?

गेल्या काही वर्षांत लेबनॉनमध्ये भ्रष्टाचार खूप वाढला आहे आणि सरकार आर्थिक व्यवस्थापनाच्या दिशेने कोणतेही ठोस पाऊल उचलू शकले नाही. लेबनॉनमध्ये केवळ अर्थव्यवस्थेची स्थितीच बिघडलेली नाही, तर राजकीय व्यवस्थाही पूर्णपणे कोलमडलेली दिसते. राजकीय पक्षांमधील गतिरोध इतका वाढला आहे की सरकार केवळ काळजीवाहू राष्ट्रपतीद्वारे चालवले जात आहे.

अधिक वाचा: Tulip Garden : आशियातले सर्वात मोठे ट्युलिप गार्डन या दिवसापासून पर्यटकांसाठी खुले होणार

वाईट काळ कसा सुरू झाला?

लेबनॉनची सत्ता नियंत्रित करण्यासाठी मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायांमध्ये संघर्ष सुरू झाला. या युद्धात इस्रायल आणि सीरियानेही भाग घेतला होता. हजारो लोक मारले गेले आणि लेबनॉनचे अनेक भाग उद्ध्वस्त झाले. संघर्ष संपल्यानंतर या युद्धात लढणारे लोक नेते झाले आणि सत्ता काबीज केली. संसाधने वळवली जाऊ लागली आणि त्यानंतर लेबनॉनमध्ये आर्थिक संकटाचा काळ सुरू झाला.  2020 मध्ये, लेबनॉनमधील बेरूत बंदरातील गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाल्याने शहर उद्ध्वस्त झाले होते ज्यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी