Brazil President Election Results: ब्राझीलचा पुन्हा ‘लेफ्ट टर्न’, तब्बल 12 वर्षांनंतर अध्यक्षपदी लूलांचं कमबॅक

ब्राझीलचे माजी राष्ट्रपती लुइस इनासियो लूला डा सिल्व्हा यांनी विद्यमान राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांचा दणदणीत पराभव केला आहे. लूलांनी आश्चर्यकारकरित्या कमबॅक करत सत्तास्थापनेपर्यंत मजल मारली आहे.

Brazil President Election Results
ब्राझीलचा पुन्हा ‘लेफ्ट टर्न’  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ब्राझीलमध्ये पुन्हा डाव्या विचारांचं सरकार
  • माजी राष्ट्रपती लूला यांचं सत्तेवर कमबॅक
  • ब्राझीलच्या राजकारणाने पुन्हा घेतला ‘लेफ्ट’ टर्न

Brazil President Election Results: संपूर्ण जगभरात अतिउजव्या विचारांचा प्रभाव गेल्या काही वर्षांपासून वाढत असल्याचं चित्र असतानाच ब्राझीलमधील निकालाने (Brazil presidential election) सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. वीस वर्षांपूर्वी सत्तेतून बाहेर गेलेल्या डाव्या पक्षांनी आता पुन्हा सत्ता मिळवण्यात यश संपादन केल्याचं चित्र आहे. ब्राझीलचे माजी राष्ट्रपती लुइस इनासियो लूला डा सिल्व्हा यांनी विद्यमान राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांचा दणदणीत पराभव केला आहे. लूलांनी आश्चर्यकारकरित्या कमबॅक करत सत्तास्थापनेपर्यंत मजल मारली आहे. जवळपास एका दशकानंतर लूला यांनी बोल्सोनारो यांनी 50.8 टक्के मतं मिळवत विजय संपादन केला आहे. लूला डी सिल्व्हा हे 2003 ते 2010 या कालावधीत ब्राझीलचे अध्यक्ष होते.  आपल्या कार्यकाळात देशाला ‘अच्छे दिन’ आणण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. 

2018 ची निवडणूक लढले नाहीत

लूला यांना 2018 साली भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यामुळे ते निवडणूक लढवू शकले नव्हते. त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीन खटला चालवण्यात आल्याचं सिद्ध झाल्यानंतर 2019 साली त्यांच्यावरील आरोप मागे घेत त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत लढलेली ही सहावी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होती. 1989 साली त्यांनी कारकिर्दीतील पहिली निवडणूक लढली होती. यावेळी देशात शांततापूर्ण क्रांती आणण्याचं आश्वासन त्यांनी या निवडणुकीत दिलं होतं. 76 वर्षांच्या लूलाने बोल्सोनारोंना पदावरून हटवण्यासाठी आपल्या यापूर्वीच्या कामगिरीवर प्रचारात भर दिला होता. सार्वजनिक व्यवस्था आणि पायाभूत सुविधांवरील खर्च वाढवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. या व्यवस्थेत करांची फेररचना करण्याचं आश्वासनदेखील देण्यात आलं होतं. देशातील कुपोषण संपवण्याचं आश्वासनही त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिलं होतं. 

अधिक वाचा - Breaking News 31 October 2022 Latest Update: जय उत्तर प्रदेशही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोजपूरीतून दिल्या छटपूजेच्या शुभेच्छा

भ्रष्टाचाराचे आरोप

लूला यांच्यावर 2017 साली सरकारी तेल कंपनीच्या व्यवहारात भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला होता. ‘ऑपरेशन कार वॉश’मध्ये भष्टाचार आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणी त्यांना दोषी धरण्यात आलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्यांना 2021 साली यातून आरोपमुक्त केलं आणि निवडणूक लढवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला होता. 

अधिक वाचा - Gujarat मध्ये केबल पूल तुटला..., सुमारे 500 लोक नदीत बुडाले, मृत्युचा थरार कॅमेऱ्यात कैद

उजवीकडून डावीकडे

देशातील बहुतांश प्रमुख राष्ट्रांमध्ये गेल्या काही वर्षांत अतिउजव्या विचारसरणीच्या पक्षांना यश मिळत असल्याचं चित्र आहे. नुकत्याच इटलीमध्ये झालेल्या निवडणुकीतही अतिउजव्या पक्षाच्या जॉर्जिया मेलोनी या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या होत्या. युरोपातील इतरही अनेक देशांत उजव्या विचारसरणीची सरकारं सत्तेवर येत आहेत. या परिस्थितीत ब्राझीलमध्ये असणारं उजव्या विचारसरणीचं सरकार पायउतार होऊन पुन्हा डाव्या विचारसरणीचं सरकार सत्तेवर आलं आहे. जागतिक इतिहासातील ही एक महत्त्वाची घटना मानली जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी