'चला नवा भारत घडवूया', अयोध्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशाला संबोधन

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या निकालानंतर देशाला संबोधित केलं. यावेळी नरेंद्र मोदींनी न्यायव्यवस्था आणि न्यायपालिका यांचे विशेष आभार मानले. 

let's create a new india prime minister narendra modi addresses the country after the ayodhya judgment
'चला नवा भारत घडवूया', अयोध्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशाला संबोधन  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • 'देशाचे न्यायाधीश, न्यायालय आणि आमची न्याय प्रणाली हे अभिनंदनास पात्र आहेत'
 • 'भारतीय न्यायपालिकेसाठी आजचा दिवस हा एका सुवर्ण अध्यायाप्रमाणे आहे'
 • 'नव्या भारतात भय, कटुता नकारात्मकता यांना काहीही स्थान नाही'

नवी दिल्ली: अयोध्या प्रकरणी आज (९ नोव्हेंबर २०१९) सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निकाल सुनावला. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशावासियांना आवाहन केलं की, 'आपण सर्व जण मिळून नवा भारत घडवू.' या निर्णयाबाबत बोलताना मोदी म्हणाले की, 'अयोध्या निकालानंतर ज्या प्रकारे प्रत्येक समुदायाने आणि संपूर्ण देशाने खुल्या दिलाने हा निर्णय स्वीकारला आहे त्यावरुन भारताची पुरातन संस्कृती, परंपरा आणि समरसतेची भावना प्रतिबिंबित होते.' असं म्हणत पंतप्रधान मोदींनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं स्वागत केलं. यावेळी मोदींनी न्यायपालिका आणि न्यायाधीशांचं कौतुकही केली. 

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या पाच सदस्यीय खंडपीठाने गेली अनेक वर्ष सुरु असलेल्या या खटल्यावर ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्या वादामुळे सामाजिक समतोल काही काळ बिघडला होता. पण आता सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी योग्य तो निकाल दिला आहे. 

पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले. 

 1. आज सुप्रीम कोर्टाने अतिशय महत्त्वपूर्ण खटल्याबाबत निकाल दिला आहे. ज्याला मागील शेकडो वर्षांचा एक इतिहास आहे. 
 2. संपूर्ण देशाची इच्छा होती की, या प्रकरणाची सुनावणी कोर्टात दररोज व्हावी. जी झाली आणि आज त्याचा निकाल देखील आला. 
 3. कोर्टाने दिलेल्या निकालानंतर सर्व जाती धर्माच्या लोकांनी आणि पूर्ण देशाने हा निर्णय खुल्या मनाने स्वीकारला. 
 4. भारतीय न्यायपालिकेसाठी आजचा दिवस हा एका सुवर्ण अध्यायाप्रमाणे आहे. 
 5. कोर्टाने या प्रकरणातील प्रत्येक गोष्ट अतिशय बारकाईने ऐकली आणि त्यानंतर सर्व संमतीने हा निर्णय देण्यात आला. 
 6. सुप्रीम कोर्टाने या निर्णयामागे दृढ इच्छाशक्ती दाखवली. यामुळे देशाचे न्यायाधीश, न्यायालय आणि आमची न्याय प्रणाली हे अभिनंदनास पात्र आहेत. 
 7. नव्या भारतात भय, कटुता नकारात्मकता यांना काहीही स्थान नाही 
 8. आजचा दिवस जोडण्याचा संदेश देत आहे. 
 9. भारतीय न्यायव्यवस्थेचे विशेष आभार 
 10. भारतीय लोकशाही आजही मजबूत आहे. 
 11. आजच कर्तारपूर कॉरिडोरला देखील सुरुवात झाली
 12. विविधतेत एकता हीच आपली ताकद आहे 
 13. अयोध्येचा निकाल हा सर्वानुमते आला 
 14. धैर्य ठेवणं हेच महत्त्वाचं आहे. 
 15. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आपल्या राज्यघटनेत आहे 
 16. न्यायव्यवस्थेचे आभार मानले पाहिजेत 
 17. राम मंदिराचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 
 18. आता देशाच्या सर्व नागरिकांवर राष्ट्र निर्माणाची जबाबदारी वाढली आहे. 
 19. भारतासमोर अनेक आव्हानं, लक्ष्य आहेत. प्रत्येक नागरिकांच्या साथीने ही आव्हानं देश पार करेल अशी मला आशा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...