Lieutenant General Anil Chauhan New CDS OF India : निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान देशाचे नवे चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ म्हणून काम करतील. सैन्यात 40 वर्षे सेवा दिल्यानंतर अनिल चौहान मागच्य वर्षी निवृत्त झाले होते. आता ते चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस या पदाची जबाबदारी स्वीकारतील.
PFI Ban : PFI सोबत 8 संघटनांवर बंदी घालणारा कायदा UAPA च्या या आहेत तरतूदी
मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात एका हेलिकॉप्टर अपघातात भारताचे पहिले चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचे निधन झाले होते. यानंतर भारताचे चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ हे पद रिक्त होते. तात्पुरती सोय म्हणून भारत सरकारने तत्कालीन लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांना हंगामी चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ केले. नरवणे लष्करप्रमुख पदावरून निवृत्त झाल्यानंतर जनरल मनोज पांडे हे भारताचे लष्करप्रमुख झाले तर नरवणे यांच्याकडे चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ या पदाची जबाबदारी पुढील निर्णय होईपर्यंत तात्पुरती सोय म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय झाला. आता अनिल चौहान नरवणेंकडून चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ पदाचा कार्यभार स्वीकारतील.
लष्करात कार्यरत असताना अनिल चौहान यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे हाताळल्या आहेत. जम्मू काश्मीर आणि ईशान्य भारतातील दहशतवादाची समस्या हाताळण्याचा मोठा अनुभव अनिल चौहान यांना आहे.
अनिल चौहान यांचा जन्म 18 मे 1961 रोजी झाला. ते 1981 मध्ये गोरखा रायफल्समध्य दाखल झाले. नॅशनल डीफेन्स अॅकॅडमी खडकवासला आणि इंडियन मिलिट्री अॅकॅडमी डेहराडून येथून लष्करी प्रशिक्षण घेतले. मेजर जनरल या पदावर असताना त्यांनी बारामुल्ला येथे एका इन्फंट्री डिव्हिजनचे कमांडिंग ऑफिसर म्हणून प्रभावी कामगिरी बजावली होती. पुढे लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांनी ईशान्य भारतात कोअर कमांड समर्थपणे हाताळली होती. ते डिसेंबर 2019 मध्ये लष्कराच्या पूर्व विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ झाले आणि 31 मे 2021 मध्ये निवृत्त झाले.
डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्स या पदाची जबाबदारी अनिल चौहान यांनी हाताळली होती. अंगोला येथे शांती सैन्यात काम केले होते. लष्करातून निवृत्त झाल्यानंतरही ते राष्ट्रीय संरक्षण आणि रणनिती या क्षेत्रात योगदान देत होते. सैन्यातील योगदानासाठी विशिष्ट सेवा पदक, सेना पदक, अतीविशिष्ट सेवा पदक अशा प्रमुख पदकांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
या आठ डिश खाल तर Non Veg ला कराल राम राम
याच वर्षी संरक्षण मंत्रालयाने एक अधिसूचना काढून चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ पदासाठी लेफ्टनंट जनरल किंवा त्यापेक्षा वरील पदावरून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचाही विचार होऊ शकतो अशी एक अपवादात्मक तरतूद केली. यानंतर एका उच्चस्तरिय समितीने अनिल चौहान यांच्या नावाची शिफारस केली. ही शिफारस भारत सरकारने स्वीकारली आहे.