Life under snow : कुदरत का कमाल! 500 मीटर बर्फाखाली सापडली जीवसृष्टी, रहस्यमय नदीतील जीव पाहून शास्त्रज्ञ सुखावले

शेकडो मीटर बर्फाखाली जीवसृष्टी असेल, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. मात्र नुकत्याच झालेल्या उत्खननातून अशी जीवसृष्टी असल्याचं आढळलं आहे.

Life under snow
500 मीटर बर्फाखाली सापडली जीवसृष्टी  |  फोटो सौजन्य: Indiatimes, Representative Image
थोडं पण कामाचं
  • बर्फाखाली सापडले जीवन
  • बर्फाखाली नदी आणि नदीत बोगदा
  • आढळले झिंग्यासारखे प्राणी

Life under snow | अंटार्क्टिकामध्ये (Antarctica) बर्फाखाली उत्खनन केल्यानंतर शास्त्रज्ञांना जीवसृष्टी (Underground river and life) असल्याचा शोध लागला आहे. वैज्ञानिकांना अशा एका इको सिस्टिमचा शोध लागला आहे, ज्याची आतापर्यंत कुणी कल्पनाही केली नसेल. बर्फांच्या डोंगरांखाली कुणी जिवंत राहू शकेल, याची कल्पनाही कुणी करत शकत नव्हतं. बर्फाचं आच्छादन असणाऱ्या जमिनीच्या खाली खोदल्यानंतर नेमकं काय असेल, या उत्कंठेतून शास्त्रज्ञांनी बर्फ खोदणं सुरू ठेवलं होतं. मात्र एका क्षणी बर्फाचा थर संपला आणि त्याखाली दडलेली एक नवी जीवसृष्टीच समोर आली. 

अंटार्क्टिटामध्ये बर्फाखाली एक नदी सापडली असून त्यात एक गुहा असल्याचं दिसून आलं आहे. या गुहेत झिंग्यासारखे काही प्राणी आढळले आहेत. या नव्या शोधामुळे वैज्ञानिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. 

असा खोदला बर्फ

अंटार्क्टिकाच्या पूर्व तटापाशी असणाऱ्या लार्सन आईस शेल्फच्या खाली वैज्ञानिकांना ही गुप्त जागा सापडली आहे. 2021 मध्ये बर्फ कोसळून तयार झालेला तो जगातील सर्वात मोठा हिमखंड आहे. रिसर्च टीमनं बर्फाखाली 1640 फूट म्हणजेच तब्बल 500 मीटर खोदकाम केलं. गरम पाण्याचा वापर करून बर्फात ड्रील करण्यात आलं. ड्रील मशीनवरच एक कॅमेरा बसवण्यात आला होता. जेव्हा 500 मीटर खोदकाम पूर्ण झालं, तेव्हा बर्फाचा भाग संपला आणि बर्फाखाली एक नदी असल्याचं दिसलं. या नदीत शोध घेताना एका गुहेचा शोध लागला. 

अधिक वाचा - Pakistan News: रशियाच्या कोंडीसाठी युरोपने केलेल्या हालचालींमुळे पाकिस्तान काळोखात जाण्याचा धोका

कॅमेरा खराब झाल्याची शंका

गुहेत कॅमेऱ्यानं प्रवेश केल्यानंतर नेमकं काय घडतंय, हे वैज्ञानिकांना समजत नव्हतं. कॅमेऱ्यात अचानक दृश्यं दिसणं बंद झालं. मात्र जेव्हा फोकस केला तेव्हा समजलं की झिंग्यांनी कॅमेऱ्याच्या लेन्सला घेरलं होतं. या गुहेत मोठ्या संख्येनं झिंग्यासारखे दिसणारे प्राणी होते. हे प्राणी पोहत पोहत आपल्या कॅमेऱ्याच्या दिशेनं आले, याचाच अर्थ तिथे जीवसृष्टी आहे, अशी प्रतिक्रिया वैज्ञानिक क्रेग स्टिवंस यांनी दिली आहे. 

बर्फाखाली नदीचा प्रवाह

अंटार्क्टिकातील बर्फाखाली पाणी आणि जीवन असण्याची शक्यता आहे, असा अंदाज कित्येक वर्षांपासून वैज्ञानिक व्यक्त करतच होते. मात्र अद्याप त्याबाबत कुठलाच ठोस अभ्यास समोर आला नव्हता. हिमखंडाखाली नदी आणि त्यात जीवसृष्टी आढळणं हा एक महत्त्वपूर्ण शोध मानला जात आहे. या नदीचं निरीक्षण करणं म्हणजे लपलेल्या अज्ञात दुनियेचा अभ्यास करणं आहे आणि प्रत्येक वैज्ञानिकासाठी ही एक पर्वणीच आहे, अशी प्रतिक्रिया वैज्ञानिकांच्या टीममधील सदस्य देत आहेत. 

अधिक वाचा - Yogi’s biggest Fan : योगी आदित्यनाथांचा मुस्लीम फॅन, छातीवर गोंदवला Tatoo

जगभर चर्चा

अंटार्क्टिकात लागलेल्या या शोधाची चर्चा पूर्ण जगभर सुरू आहे. जर बर्फाखाली जीवसृष्टी सापडू शकते, तर इतरही अनेक ठिकाणी तशा शक्यता पडताळून पाहण्याची आशा निर्माण झाली आहे. जगातील इतर हिमाच्छादित भागातही अशीच जीवसृष्टी सापडू शकेल काय किंवा बर्फाखाली अशी इको सिस्टिम अस्तित्वात असेल काय, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी