शिंजो आबे: एका स्टील कंपनीत काम करणारा तरुण ते जपानचे पंतप्रधान

Shinzo Abe Life Journey: जपानच्या सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली नेत्यांपैकी एक माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची निवडणूक सभेदरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

life journey of shinzo abe from working in a steel company to prime minister of japan
शिंजो आबे: एका स्टील कंपनीत काम करणारा तरुण ते जपानचे पंतप्रधान  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
 • जाणून घ्या शिंजो आबे यांचा जीवन प्रवास
 • जपानच्या राजकारणात आपला ठसा उमटवणारा नेता
 • शिंजो आबे हे जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान होते

Shinzo Abe Life Journey : प्रमुख राजकीय कुटुंबात जन्मलेल्या शिंजो आबे (Shinzo Abe) यांनी जपानचे (Japan) पंतप्रधान (Prime Minister) म्हणून सर्वाधिक काळ काम केले. आबे यांची शुक्रवारी पश्चिम जपानमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आर्थिक अस्थिरतेने त्रस्त असलेल्या जपानमध्ये स्थिरता आणण्याचे श्रेय आबे यांना जाते. तथापि, देशाच्या शांततावादी संविधानात सुधारणा करण्याच्या त्यांच्या आवाहनांमुळे जपानमधील काही लोकं तसेच शेजारील दक्षिण कोरिया आणि चीन प्रचंड नाराज झाले होते.

अधिक वाचा: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या, मारेकऱ्याला अटक

शिंजो आबे यांच्या जीवन प्रवासाशी (Shinzo Abe Life Journey) संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी: -

 1. 21 सप्टेंबर 1954: आबे यांचा जन्म टोकियो येथे झाला. त्यांचे वडील शिंतारो आबे हे जपानचे परराष्ट्र मंत्री होते, तर आजोबा नोबुसुके किशी हे पंतप्रधान होते.

 2. 1977: टोकियोमधील सेकी विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी घेतल्यानंतर, दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात तीन सेमिस्टरसाठी सार्वजनिक धोरणाचा अभ्यास करण्यासाठी ते अमेरिकेला गेले.
 3. 1979: आबे यांनी कोबे स्टील कंपनीत काम सुरु केलं. कंपनी  परदेशात देखील आपला विस्तार करत होती.
 4. 1982: परराष्ट्र मंत्रालय आणि सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (LDP) मध्ये नवीन पदे स्वीकारण्यासाठी कंपनी सोडली.
 5. 1993: यामागुचीच्या दक्षिण-पश्चिम प्रांताचे प्रतिनिधी म्हणून प्रथमच आबे निवडून आले. एक पुराणमतवादी म्हणून ओळखले जाणारे आबे पक्षाच्या सिवाकाई गटातील होते, ज्याचे नेतृत्व त्यांच्या वडिलांनी केले होते.
 6. 2005: आबे यांची पंतप्रधान जुनिचिरो कोइजुमी यांच्या सरकारमध्ये मुख्य कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याच वर्षी ते एलडीपीचे प्रमुख म्हणून निवडून आले.
 7. 26 सप्टेंबर 2006: आबे प्रथमच जपानचे पंतप्रधान झाले. आर्थिक सुधारणांवर लक्ष केंद्रित करण्यासोबतच उत्तर कोरियाबाबत त्यांनी कठोर भूमिका घेतली.
 8. 2007: एलडीपीच्या निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर आबे यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला.
 9. 2012: एलडीपीच्या अध्यक्षपदी पुन्हा निवडून आल्यानंतर आबे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले.
 10. 2013: आबे यांनी त्यांची 'आबेनॉमिक्स' धोरणं सुरु केली, ज्यात वाढीला चालना देण्यासाठी सुलभ कर्ज आणि संरचनात्मक सुधारणांचे वैशिष्ट्य होते. जपानचे चीनसोबतचे संबंध बिघडले होते. पण बीजिंगमधील APEC शिखर परिषदेत आबे यांनी चीनचे नेते शी जिनपिंग यांची भेट घेतल्यानंतर संबंध सुधारू लागले होते.
 11. 2014-2020: आबे पुन्हा एकदा LDP चे नेते निवडले गेले. पंतप्रधान म्हणून दोन अतिरिक्त कार्यकाळात त्यांनी हे पद भूषवले.
 12. 28 ऑगस्ट 2020: तब्येतीचे कारण सांगून आबे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
 13. 8 जुलै 2022: देशाच्या पश्चिम भागात निवडणूक प्रचारादरम्यान शिंजो आबे यांना गोळ्या घालण्यात आल्या. रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी