आधार कार्डला असे लिंक करा व्होटर आयडी कार्ड

link aadhar card with voter id card, full process in marathi : केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार मतदारांना त्यांचे आधार कार्ड आणि व्होटर आयडी कार्ड एकमेकांना लिंक करावे लागणार आहे. ही प्रक्रिया संबंधित नागरिकांना ऑनलाईन करायची आहे.

link aadhar card with voter id card, full process in marathi
आधार कार्डला असे लिंक करा व्होटर आयडी कार्ड 
थोडं पण कामाचं
  • आधार कार्डला असे लिंक करा व्होटर आयडी कार्ड
  • आधार कार्ड आणि व्होटर आयडी कार्ड एकमेकांशी लिंक करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आणि विनामूल्य
  • प्रत्येक नागरिक ही प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करू शकतो

link aadhar card with voter id card, full process in marathi : केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार मतदारांना त्यांचे आधार कार्ड आणि व्होटर आयडी कार्ड एकमेकांना लिंक करावे लागणार आहे. ही प्रक्रिया संबंधित नागरिकांना ऑनलाईन करायची आहे. बोगस व्होटिंगला आळा घालण्यासाठी आधार कार्ड आणि व्होटर आयडी कार्ड एकमेकांना लिंक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आधार कार्डला असे लिंक करा व्होटर आयडी कार्ड

  1. आधार कार्ड आणि व्होटर आयडी कार्ड एकमेकांशी लिंक करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि विनामूल्य आहे. प्रत्येक नागरिक ही प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करू शकतो.
  2. https://voterportal.eci.gov.in/dashboard या वेबसाईटवर जा
  3. वेबसाईटवर आपले अकाउंट असेल तर लॉग इन करा नाही तर Create an account येथे क्लिक करून नव्या अकाउंटसाठी नोंदणी करा. 
  4. आपल्या ई मेल अॅड्रेस (ई मेल पत्ता) अथवा पर्सनल मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करू शकता.
  5. नोंदणी केल्यानंतर संबंधित ई मेल अॅड्रेस (ई मेल पत्ता) वा पर्सनल मोबाईल नंबर वा व्होटर आयडी नंबर आणि पासवर्ड टाइप करून लॉगइन करा. 
  6. राज्य, जिल्हा आणि इतर माहिती भरा. यानंतर Search वर क्लिक करुन इतर डेटा समाविष्ट करुन feed aadhar number वर क्लिक करा. यानंतर submit वर क्लिक करून आधार आणि व्होटर आयडी कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करा. 
  7. ज्या मतदारांना आधार कार्डला व्होटर आयडी कार्ड लिंक करायचे नाही किंवा ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा २००५ (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act 2005 - MGNREGA) अंतर्गत मिळालेले जॉब कार्ड, फोटो असलेले बँक पासबूक, ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन चालविण्याचा परवाना), पॅन कार्ड, पासपोर्ट, हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड, पेन्शन सर्टिफिकेट (पेन्शन प्रमाणपत्र), सरकारी सेवा ओळखपत्र, खासदार वा आमदार यांनी प्रमाणित केलेले ओळखपत्र, सामाजिक न्याय मंत्रालयाने दिलेले युनिक आयडी कार्ड या कागदपत्रांद्वारे आपले व्होटर आयडी कार्ड व्हेरिफाय करुन घ्यावे लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी