१७ मे पर्यंत MRP नुसार दारू विक्री, 'या' राज्याने घेतला निर्णय

लोकल ते ग्लोबल
Updated May 09, 2020 | 16:40 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Liquer sale on MRP in Karnataka: कर्नाटक राज्यात १७ मे पर्यंत (एमआरपी) कमाल किरकोळ किंमतीने दारू विक्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकतेच कर्नाटक राज्यात दारुची किंमत वाढवण्यात आली होती.

Liquor sale on MRP in Karnataka
१७ मे पर्यंत छापील किमतीनुसार मिळणार दारू (प्रातिनिधीक फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • कर्नाटक राज्यात १७ मे पर्यंत छापील किमतीने दारू विक्री करण्याचे सरकारचे आदेश
  • महसूल तुट भरून काढण्यासाठी घेतला निर्णय
  • पब, क्लब, बार आणि रेस्टॉरंट मालकांना या बाबतीत दिल्या कडक सूचना

नवी दिल्ली: कर्नाटक राज्य सरकारने  १७ मे पर्यंत छापील किमतीनुसार दारू विक्रीसाठी क्लब, बार आणि रेस्टॉरंटला परवानगी दिली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कर्नाटक सरकारने ६ मे रोजी अबकारी कर ११ टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने कोरोनाला आळा घालण्यासाठी दारुच्या दुकानावर असलेली बंदी हटविल्यानंतर दोनच दिवसांनी राज्याची महसूली तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारने अबकारी कर वाढवण्याचा निर्णय घेतला. 

...तर परवाना रद्द करण्यात येईल

यापुर्वी राज्याच्या अर्थसंकल्पात दारुवरील अबकारी कर सहा टक्क्यांनी वाढवण्यात आला होता. तर ६ मे च्या निर्णयानंतर लगेचच यात बदल करत छापील किमतीनुसार दारु विक्री करण्याचा आदेश काढण्यात आला. दुसरीकडे कर्नाटक राज्य सरकारने पब, क्लब, बार आणि रेस्टॉरंट मालकांना कडक सुचना  दिल्या आहेत की, जर त्यांच्या व्यापारी संकुलाच्या परिसरात दारु पिताना कोणी आढळला तर सबंधित पब, क्लब, बार किंवा रेस्टॉरंटचा परवाना रद्द करण्यात येईल. 

मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पांनी दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ६ मे रोजी म्हटले होते की, आम्ही अबकारी कर ११ टक्क्यांनी वाढवला आहे. ही वाढ अर्थसंकल्पात केलेल्या वाढेव्यतिरीक्तची वाढ आहे. नवीन कर पध्दतीची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी एक ते दोन दिवसांचा कालावधी लागेल. कारण दारुच्या पॅकिंगवर त्यासंबधाने स्टॅम्प करण्यासाठी आणि इतर प्रक्रियेसाठी काही वेळ लागू शकतो.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन विक्री किंवा होम डिलेव्हरी (घरपोच सेवा) या दोन पर्यायांचा विचार करावा असे सुचविले होते. यावर कर्नाटक सरकारने अजून कुठलाही निर्णय घेतला नाही. तथापी संपूर्ण कर्नाटक राज्यात कोरोना प्रतिबंधित भागाव्यतिरीक्त इतर भागात सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत दारुची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी