Strong Rupee : गेल्या काही आठवड्यांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य कमी होत आहे. मात्र जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत, जिथं रुपयाचं मूल्य त्या देशातील चलनाच्या तुलनेत वाढत चाललं आहे. भारताच्या रुपयाच्या तुलनेत अनेक देशातील चलनाची किंमत अधिक आहे. अमेरिका आणि युरोपातील बहुतांश देशांचा यात समावेश आहे. त्यामुळे भारतीयांना या ठिकाणी फिरायला जाणं नेहमीच महागात पडतं. भारतीय रुपयाच्या तुलनेत डॉलर किंवा पाउंड हे चलन खूप महाग असल्यामुळे या देशात फिरायला जाण्याची मौज केवळ श्रीमंत लोकच करू शकतात. मात्र सर्वसामान्य आणि मध्यमवर्गियांना परवडेल, असेही काही देश जगात आहेत. जाणून घेऊया, अशाच काही देशांविषयी.
व्हिएतनाम या दक्षिण आशियातील एक देश आहे. जगभरात हा देश एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. इथले देखणे समुद्रकिनारे, संस्कृती आणि अन्न पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आले आहेत. भारताच्या एका रुपयाचं मूल्य 294.21 व्हिएतनामी डॉलर एवढं आहे. याचाच अर्थ जर तुमच्याकडे 100 रुपये असतील, तर तुमच्याकडे 29 हजार 421 व्हिएतनामी डॉलर होतील.
इंडोनेशिया हा आशियाई महाद्विपाचा एक भाग आहे. या देशात अनेक हिंदू आणि बौद्ध मंदिरे आहेत. इंडोनेशियाई रुपया असं इथल्या चलनाचं नाव. एका रुपयाची किंमत होते 188.11 इंडोनेशियाई रुपये. याचाच अर्थ जर तुमच्याकडे भारतीय चलनातील 100 रुपये असतील तर त्याचं मूल्य होतं 18 हजार 811 इंडोनेशियाई रुपये.
अधिक वाचा - Self Kidnapping : अमेरिकी तरुणीनं रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, दिल्ली पोलिसांनी असा उधळला डाव
या देशातील अनेक सुंदर गावं आणि धबधबे हे पर्यटकांच्या आकर्षणाचं मुख्य केंद्र. इथल्या चलनाचं नाव आहे कीप. भारताचा एक रुपया हा जवळपास 188 कीपच्या बरोबरीचा ठरतो. याचाच अर्थ तुमच्याकडे 100 रुपये असतील तर त्याचं मूल्य 18,800 कीप एवढं होतं.
पॅराग्वे हा देश दक्षिण अमेरिकेचं हृदय मानलं जातं. गुआरानी असं इथल्या चलनाचं नाव आहे. एका भारतीय रुपयाचं मूल्य होतं 86.08 गुआरानी. म्हणजेच जर तुमच्याकडे 100 रुपये असतील, तर त्याची किंमत होईल 8608 गुआरानी.
अधिक वाचा - चिंता वाढवणारी बातमी..!, मंकीपॉक्सनं वाढवली डोकेदुखी; 'या' राज्यात आढळला दुसरा रूग्ण
कंबोडिया हा एक आशियायी देश आहे, जो प्राचीन आणि पुरातन इमारतींसाठी ओळखला जातो. शेकडो वर्षं जुन्या इमारती आजही या देशाने जतन करून ठेवल्या आहेत. दरवर्षी हजारो पर्यटक ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी या देशाला भेट देतात. या देशाचं चलन आहे कंबोडियाई रियल. एका भारतीय रुपयाची किंमत 51 कंबोडियाई रियल एवढी होते. म्हणजेच तुम्हाला 100 रुपयांच्या बदल्यात 5100 कंबोडियाई रियल मिळू शकतात.
साउथ कोरिया हा पूर्व आशियाई देश आहे. गेल्या काही दिवसांपासून इथला K Dramas हा प्रकार जगभर लोकप्रिय होत आहे. फॅशन, टेक्नॉलॉजी आणि कॉस्मॅटिक सर्जरीसाठी हा देश ओळखला जातो. या देशातील चलनाचं नाव आहे वॉन. एक रुपया बरोबर 16 वॉन. म्हणजेच 100 रुपयांची किंमत होते 1600 वॉन.
अधिक वाचा - Exclusive: फक्त एका क्षणाची चूक अन् अवघ्या 5 सेकंदात अनेकांनी गमावला जीव
उजबेकिस्तान हा मध्य आशियातील एक संपन्न देश. इथं इस्लामिक कल्चर पाहण्यासाठी पर्यटक येतात. इस्लामी पद्धतीच्या मशिदी आणि इमारती इथं पाहता येतात. एका भारतीय रुपयाची किंमत आहे 137 उजबेकी सोम. म्हणजेच 100 रुपयांची किंमत होते 13,700 सोम.