Governor : देशात 13 राज्यपालांच्या नियुक्त्या, कोश्यारींचा राजीनामा मंजूर, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

List Of Governor Appointments, Koshyari Resignation Accepted, Ramesh Bais New Governor Of Maharashtra : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि लडाखचे लेफ्टनंट राज्यपाल राधा कृष्णन माथूर यांचा राजीनामा मंजूर केला. तसेच 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी राज्यपालांच्या नियुक्तीचे आदेश जाहीर केले.

List Of Governor Appointments
राज्यपाल नियुक्तीचे आदेश  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • देशात 13 राज्यपालांच्या नियुक्त्या
  • कोश्यारींचा राजीनामा मंजूर
  • रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

List Of Governor Appointments, Koshyari Resignation Accepted, Ramesh Bais New Governor Of Maharashtra : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि लडाखचे लेफ्टनंट राज्यपाल राधा कृष्णन माथूर यांचा राजीनामा मंजूर केला. तसेच 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी राज्यपालांच्या नियुक्तीचे आदेश जाहीर केले. राज्यपालांच्या नेमणुका त्यांनी त्यांच्या संबंधित कार्यालयाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून प्रभावी असतील. राष्ट्रपती कार्यालयाने ही माहिती दिली आहे. 

काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा पाठवून दिला होता. राज्यपालपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती कोश्यारी यांनी केली होती. राष्ट्रपतींनी कोश्यारींचा राजीनामा मंजूर केला. यानंतर लगेच महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांच्या नियुक्तीचा निर्णय राष्ट्रपती कार्यालयातून जाहीर करण्यात आला. 

कोण आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस?

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस मूळचे छत्तीसगडचे आहेत. ते रायपूर येथून 7 वेळा खासदार झाले आहेत.  बैस हे देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिले आहेत. त्यांना 2019 मध्ये त्रिपुराचे राज्यपाल करण्यात आले. नंतर २०२१ मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नेमणूक झाली. आता त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

तुर्कस्तान आणि सीरियात भारताचे ऑपरेशन दोस्त

AIच्या नजरेतून बॉलिवूडच्या 'हॉट दिवाज'

राज्यपाल नियुक्तीचे आदेश

  1. लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, पीव्हीएसएम, यूवायएसएम, वायएसएम (निवृत्त), अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्त
  2. सिक्कीमचे राज्यपाल म्हणून लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची नियुक्ती
  3. झारखंडचे राज्यपाल म्हणून श्री. सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती
  4. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून श्री. शिव प्रताप शुक्ला यांची नियुक्ती
  5. आसामचे राज्यपाल म्हणून गुलाबचंद कटारिया यांची नियुक्ती
  6. आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून न्यायमूर्ती (निवृत्त) एस. अब्दुल नझीर यांची नियुक्ती
  7. आंध्र प्रदेशचे सध्याचे राज्यपाल विश्व भूषण हरिचंदन यांची छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून नियुक्त
  8. छत्तीसगढचे सध्याचे राज्यपाल अनुसुया उकिये यांची मणिपूरचे राज्यपाल म्हणून
  9. मणिपूरचे राज्यपाल गणेशन यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  10. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  11. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  12. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून झारखंडचे सध्याचे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  13. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल लेफ्टनंट ब्रिगेडियर (निवृत्त) डॉ. बी. डी. मिश्रा यांची लडाखचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

अ. राज्यपालांच्या नेमणुका त्यांनी त्यांच्या संबंधित कार्यालयाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून प्रभावी असतील.

ब. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि लडाखचे लेफ्टनंट राज्यपाल राधा कृष्णन माथूर यांचा राजीनामा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी