अॅप्सवर पत्नींसोबत करायचा सेक्सचा लाइव्ह शो, पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

मध्य प्रदेशच्या विदिशामध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याने पत्नीसोबत लैंगिक संबंध ठेवत असतानाचे लाइव्ह स्ट्रिमिंग केल्याच्या त्याच्यावर आरोप आहे. 

crime
अॅप्सवर पत्नींसोबत करायचा सेक्सचा लाइव्ह शो, आरोपी अटकेत  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • अनेक अ‍ॅप्सवर सेक्सचे लाइव्ह शो करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी केली अटक
  • या प्रकाराबाबत पहिल्या पत्नीला कोणतीही तक्रार नव्हती
  • दुसर्‍या पत्नीने पोलिसांत केलेल्या तक्रारीनंतर करण्यात आली अटक 

विदिशा (मध्य प्रदेश): मध्य प्रदेशातील विदिशामध्ये एका 24 वर्षीय व्यक्तीला पैशासाठी वेगवेगळ्या मोबाईल अ‍ॅप्सवर (Mobile Apps) आपल्या दोन पत्नींसोबत (Wife) सेक्स करतानाचे लाइव्ह स्ट्रिमिंग (Live streaming) केल्याप्रकरणी अटक (Arrest) करण्यात आली आहे. अनेकांनी त्याला या‘लाइव्ह शो'साठी पैसे दिले. ज्यामधून त्याने लाखो रुपये (Money) कमावले असल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हा या २४ वर्षीय व्यक्तीच्या दुसऱ्या पत्नीने याप्रकरणी पोलिसात तक्रार केली तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक देखील केलं. त्याच्यावर अत्याचार आणि धमकी तसेच बलात्काराचादेखील आरोप आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे, परंतु त्याला तंत्रज्ञानाविषयी बरीच माहिती आहे. तो बर्‍याच डेटिंग अ‍ॅप्सवर अ‍ॅक्टिव्ह होता आणि या अ‍ॅप्सद्वारे पैसे कसे मिळवायचे हे देखील त्याने शिकलं होतं.

त्याने आपल्या अ‍ॅप्स एक डीपी ठेवला होता. जो कोणी हा डीपी लाइक करायचा त्याला मेनूसह एका मेसेज जायचा ज्यामध्ये डेमोसाठी १०० रुपये द्यावे लागायचे. तसेच त्यापुढील प्रत्येक कृतीसाठी ५००, ७०० आणि १००० रुपयांपर्यंत पैसे आकारले जायचे. याशिवाय 'फेसलेस' आणि 'फेस' स्ट्रमिंगसाठी स्वतंत्र शुल्क होते. २८ ऑगस्ट रोजी सुरु करण्यात आलेल्या त्याच्या बँक खात्यात पोलिसांना तब्बल ६ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे आढळून आले आहे. पोलिसांच्या मते तो दिवसातून ३ ते ४ हजार रुपयांची कमाई करायचा.

आरोपीची पहिली पत्नी बंगळुरुची आहे. सोशल मीडियावरच त्या दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर दोघांनी लग्न देखील केलं. दरम्यान आरोपीची पहिली पत्नी ही सात महिन्यांपासून गरोदर आहे. तर त्याची दुसरी पत्नी ही उत्तर प्रदेशची असून ती एका अध्यात्मिक गुरुची अनुयायी आहे. यावेळी आरोपीने स्वत: देखील त्याच गुरुचा भक्त असल्याचा सांगत महिलेला आपल्या जाळ्यात अडकवलं होतं. त्यानंतर दोघांनी मंदिरात लग्न केलं होतं.

दरम्यान, त्याच्या पहिल्या पत्नीची त्याच्याविषयी कोणतीही तक्रार नव्हती. आपल्या चांगल्या भविष्याची स्वप्ने दाखवून त्याने तिला पटवलं होतं. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, चौकशीत आरोपीने दोन्ही बायकांसह सेक्स करतानाचे लाइव्ह स्ट्रिमिंग केल्याचे कबूल केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी