LIVE Updates: राज्यात तब्बल २९४० रुग्णांचे निदान, ६३ जणांचा मृत्यू

शात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या आता १ लाख १६ हजारच्या पुढे गेली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या अपडेटशिवाय आपल्याला जगभरातील प्रत्येक अपडेट्स इथे पाहता येतील

live update 22 may 2020 lockdown india maharahstra world news
बरे झालेल्यांची संख्या विक्रमी; एकाच दिवसात १४०८ रुग्णांना घरी सोडले  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • देशात आता ३१ मे पर्यंत लॉकडाऊन आणखी वाढविण्यात आला आहे
 • कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारही आपआपल्या परीनं वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे.
 • देशात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या आता १ लाख १६ हजारच्या पुढे गेली आहे.

मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. देशातही रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. देशात आता ३१ मे पर्यंत लॉकडाऊन आणखी वाढविण्यात आला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारही आपआपल्या परीनं वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. देशात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या आता १ लाख १६ हजारच्या पुढे गेली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या अपडेटशिवाय आपल्याला जगभरातील प्रत्येक अपडेट्स इथे पाहता येतील

Live Updates : 


 1. राज्यात २९९० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या ही ४४,५८२ इतकी झाली आहे. यापैकी ८५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३०,७४७ इतकी झाली आहे.  राज्यात आतापर्यंत १२,५८३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
 2. पुण्यात भुसार बाजार २५ मे पासून सुरू होणार 
 3. पीएमपीएल बस आता पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत धावणार 
 4. जालनात ७ नवे रुग्ण, एकूण आकडा ५१ 
 5. नागपूरमधील थायरोकेअर लॅबवर बंदी, कोरोनाचे अनेक रिपोर्ट चुकीचे असल्याने पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कारवाई केली आहे. 
 6. राज्यात आतापर्यंत २७८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. 
 7. मुंबईत शिकाऊ डॉक्टरांना ५० हजार रुपये शिकाऊ वेतन करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. 
 8. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आंदोलनावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे. भाजपचे सरकार विरूद्धचे आंदोलन हे पोटदुखी, आंदोलनाची ही वेळ नाही, संजय राऊतांची टीका 
 9.  'मेरा आंगन, मेरा रणांगण' आंदोलनाला नागपूरमध्ये पोलिसांनी भाजप नेत्यांना बजावल्या नोटीसा. 
 10. राज्यात ठाकरे सरकार विरोधात भाजपने ' मेरा आंगन, मेरा रणांगण' आंदोलन सुरू केले आहे. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते आपल्या घराच्या अंगणात उभे राहून हाता फलक घेऊन ठाकरे सरकार विरोधात घोषणाबाजी देत आहे. केंद्राने २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले तरी राज्य सरकार परिस्थिती हाताळण्यास कमी पडत आहे, असे पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट म्हणाले. 
 11. राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ६४२ झाली आहे. २१ मे रोजी  २३४५ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात २१ मे रोजी  १४०८ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ११ हजार ७२६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २८ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  सांगितले.
 12. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख १९ हजार ७१० नमुन्यांपैकी २ लाख ७८ हजार ६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४१ हजार ६४२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ३७ हजार ३०४ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २६ हजार ८६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 13. राज्यात ६४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद २१ मे रोजी  झाली असून एकूण संख्या १४५४ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ४१, मालेगाव ९, पुण्यात ७, औरंगाबाद  शहरात ३, नवी मुंबईमध्ये २, पिंपरी- चिंचवड -१ तर सोलापूरात १  मृत्यू झाले आहेत.
 14. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३६  पुरुष तर २८ महिला आहेत. आज झालेल्या ६४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३१  रुग्ण आहेत तर २९  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६४ रुग्णांपैकी ३८ जणांमध्ये ( ५९ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १४५४ झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी