Coronavirus in china: चीनच्या वुहान शहरात सर्वप्रथम कोरोना विषाणू आढळून आला. त्यानतंर चीनच्या निष्काळजीपणामुळे हा व्हायरस संपूर्ण जगभरात पसरला. त्याच वुहानमध्ये आता पुन्हा कोरोना बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वुहान प्रांतात चार कोरोना बाधित आढळून आल्यावर काही ठिकाणी व्यापार आणि सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. १० लाख लोकशंख्या असलेल्या वुहानच्या जियांगक्सिया जिल्हयात तीन दिवसांसाठी मेट्रो आमि बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (lockdown in some places in wuhan china after new coronavirus cases reported)
चीनच्या वुहान शहरातील जिआंगक्सिया जिल्ह्यात कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले आहेत. रिपोर्ट्सनुसार, या जिल्ह्याची लोकसंख्या १० लाख इतकी आहे आणि तेथे आता लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तसेच नागरिकांना एकत्र जमण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. तसेच मॉल्स, मनोरंजनाची ठिकाणेही बंद करण्यात आली आहेत. रिपोर्ट्सनुसार, नागरिकांना तीन दिवस घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चीनच्या वुहान शहरातून कोरोनाचा उद्रेक आधी झाला होता आणि तेथेच पुन्हा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रिपोर्ट्सनुसार, चीनमधील "डायनॅमिक कोविड झिरो" धोरणाचा एक भाग म्हणून देशभरातील अधिकाऱ्यांनी लॉकडाऊन आणि मास टेस्टिंग लागू केलं आहे. ज्या ठिकाणी टेस्टिंग सुरू आहे त्या ठिकाणी हातावर मोजण्याइतपत रुग्ण आढळून आल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, बाधित आढळून आल्यावर चीनमध्ये पुन्हा कठोर निर्बंध आणि लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.
चीनच्या अर्थव्यवस्थेवर दुसऱ्या तिमाहीत प्रत्येक वर्षाला केवळ ०.४ टक्के इतकीच वाढ झाली आहे. चीनमधील अनेक व्यावसायिक शहरे अनेक महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये होती आणि त्यामुळे चीनची अर्थव्यवस्था हळूहळू वाढत आहे. आशियाई विकास बँकेने चीनसाठी २०२२ चा विकास दर एप्रिलमध्ये ५ टक्क्यांवरुन कमी करत ४ टक्क्यांवर आणला.