कॉंग्रेसच्या रॅलीत प्रियांका चोप्रा जिंदाबादचे नारे, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 02, 2019 | 17:06 IST | Times Now

भाषणादरम्यान त्यांनी आपला हात वर करत प्रियंका गांधी जिंदाबाद, कॉंग्रेस पार्टी जिंदाबाद! राहुल गांधी जिंदाबाद, प्रियांका चोप्रा जिंदाबाद! अशा घोषणा दिल्या. खरं तर सुरेंद्र कुमार यांना प्रियंका गांधीच म्हणायचं हो

Surendra kumar
कॉंग्रेसच्या रॅलीत प्रियांका चोप्रा जिंदाबादचे नारे  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • प्रियंका गांधी जिंदाबाद, कॉंग्रेस पार्टी जिंदाबाद! राहुल गांधी जिंदाबाद, प्रियांका चोप्रा जिंदाबाद!
  • शिरोमणी अकाली दलाचे मनजिंदर सिंग सिरसा यांनीदेखील सुरेंद्र कुमार यांच्यावर ताशेरे ओढण्याची संधी सोडलेली नाही.

नवी दिल्ली : दिल्लीत कॉंग्रेसच्या रॅलीदरम्यानचा कॉंग्रेसचे आमदार सुरेंद्र कुमार यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. सुरेंद्र कुमार यांनी चक्क प्रियंका गांधी जिंदाबाद म्हणण्याऐवजी प्रियांका चोप्रा जिंदाबाद अशा घोषणा दिल्या.

रविवारी दिल्लीतील कॉंग्रेसची एक रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीदरम्यान कॉंग्रेसचे आमदार सुरेंद्र कुमार यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र या घोषणाबाजीचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. तो यासाठी की या रॅलीमध्ये सुरेंद्र कुमार यांनी थेट प्रियांका चोप्रा जिंदाबाद असा नारा दिला. त्यांना खरं तर प्रियंका गांधी जिंदाबाद म्हणायचं होतं, मात्र तोंडातून निघालं प्रियांका चोप्रा. सुरेंद्र कुमार यांच्या तोंडून चुकून प्रियांका चोप्रा जिंदाबाद अशा नारा निघाला खरं, मात्र पुढे सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. यावर नेटकऱ्यांनी त्यांची खिल्लीही उडवली.

दिल्लीतील या रॅलीत सुरेंद्र कुमार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुभाष चोप्रा आणि इतर बडे नेते उपस्थित होते. रॅलीदरम्यान आमदार सुरेंद्र कुमार यांना मंचावर भाषण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. भाषणादरम्यान त्यांनी आपला हात वर करत प्रियंका गांधी जिंदाबाद, कॉंग्रेस पार्टी जिंदाबाद! राहुल गांधी जिंदाबाद, प्रियांका चोप्रा जिंदाबाद! अशा घोषणा दिल्या. खरं तर सुरेंद्र कुमार यांना प्रियंका गांधीच म्हणायचं होतं मात्र चुकून त्यांच्या तोंडून प्रियांका चोप्रा असे शब्द निघाले. त्यानंतर लगेचच मंचावर असलेले सुभाष चोप्रा यांनी परिस्थिती सावरत पुन्हा प्रियंका गांधी जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. त्यानंतर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले.

ट्विटरवर या व्हिडिओवरून चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. त्यातच शिरोमणी अकाली दलाचे मनजिंदर सिंग सिरसा यांनीदेखील सुरेंद्र कुमार यांच्यावर ताशेरे ओढण्याची संधी सोडलेली नाही. “कॉंग्रेसच्या रॅलीमध्ये प्रियांका चोप्रा जिंदाबादचे नारे, ही पूर्ण पार्टीच पप्पू आहे वाटतं”, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. कॉंग्रेस हे राजकारण सोडून एक कॉंमोडियन पक्ष म्हणून उदयास येत आहे असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी