ग्रॅज्युएट्स, पोस्ट ग्रॅज्युएट्ससाठी सुवर्णसंधी, लोकसभा इंटर्नशीप २०२१, शिवाय मिळवा २५,००० रुपयांचा स्टायपेंड

लोकसभेने इंटर्नशीपसाठी जाहिरात दिली आहे. या इंटर्नशीपच्या माध्यमातून देशातील सर्वोच्च संस्था असलेल्या लोकसभेशी निगडीत विविध बाबींचा अभ्यास करण्याची आणि अनुभव घेण्याची संधी मिळेल.

Lok Sabha Internship 2021
लोकसभा इंटर्नशीप २०२१ 

थोडं पण कामाचं

 • लोकसभा इंटर्नशीप २०२१ साठीची पात्रता
 • इंटर्नशीपचे स्वरुप
 • अर्ज कुठे आणि कसा करायचा

नवी दिल्ली : लोकसभेविषयी तुम्ही बातम्यांमधून ऐकत असाल, वाचत असाल किंवा पाहत असाल. मात्र या लोकसभेत (Lok Sabha) प्रत्यक्ष इंटर्नशीप करण्याची संधी मिळाली तर काय मजा येईल. जर तुम्ही पदवीधर असाल किंवा पदव्युत्तर पदवी घेतलेली असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. लोकसभेत इंटर्नशीप (Lok Sabha Internship 2021) करण्याची ही संधी तुम्हाला मिळू शकते. लोकसभेने इंटर्नशीपसाठी जाहिरात दिली आहे. या इंटर्नशीपच्या (Lok Sabha Internship)  माध्यमातून देशातील सर्वोच्च संस्था असलेल्या लोकसभेशी निगडीत विविध बाबींचा अभ्यास करण्याची आणि अनुभव घेण्याची संधी मिळेल. या इंटर्नशीपमध्ये Parliamentary Research and Training Institute for Democracies या संस्थेत काम करण्याची संधी मिळते.  देशाच्या सर्वोच्च पातळीवरून विविध क्षेत्रांचा अभ्यास करण्याच संधी या इंटर्नशीपमध्ये मिळेल. ही संधी १८ ते २५ वर्षे वयोगटातील पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधारकांसाठी आहे. (Lok Sabha Internship 2021 for Graduates, Postgraduates, with Stipend of Rs 25,000)

तुम्हाला माहीत असाव्यात अशा महत्त्वाच्या बाबी -

 1. ही इंटर्नशीप फक्त भारतीय नागरिकांसाठीच आहे
 2. भारतातील सर्वोत्तम तरुणांसाठी एक ते अकरा महिन्यांच्या कालावधीसाठी ही इंटर्नशीप आहे.
 3. इंटर्नशीपसाठी निवड झालेल्या उमेदवारांना इंटर्नशीपच्या कालावधीत २५,००० रुपयांचा स्टायपेंड किंवा शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
 4. ज्या तरुणांची या इंटर्नशीपसाठी निवड होईल त्यांना लोकशाहीसाठीच्या संसदीय संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेत म्हणजेच पार्लमेंटरी रिसर्च अॅंड ट्रेनिंग इन्स्टिट्युट फॉर डेमोक्रसीजमध्ये (Parliamentary Research and Training Institute for Democracies) (PRIDE)काम करण्याची संधी मिळेल.
 5. ज्या उमेदवारांना संशोधन (research), काउन्सेलिंग (counselling), व्यवस्थापन (management), विपणन (marketing), कॉम्प्युटर्स (computers) आणि संबंधित क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असेल त्यांना प्राधान्य दिले जाईल. 
 6. जे उमेदवार प्रोफेशनल कोर्स करत असतील आणि ज्यांनी ४ किंवा ५ वर्षांच्या प्रोफेशनल कोर्सपैकी पहिले वर्ष पास केलेले असेल असे तरुणदेखील या इंटर्नशीप प्रोग्रॅमसाठी अर्ज करू शकतात.

लोकसभा इंटर्नशीप २०२१साठी अर्ज कसा करायचा?

इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अर्ज दिलेल्या फॉर्मेटमध्ये pride.internship@sansad.nic.in या ईमेल आयडीवर पाठवावा किंवा अर्जाची प्रत प्राईडच्या पत्त्यावर पाठवावी. प्राईडचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे, रुम नं. जी-०८३, तळमजला, पीएलबी, नवी दिल्ली. अर्जासोबत सर्व संबंधित कागदपत्रे जोडावीत. लोकसभा इंटर्नशीप २०२१ साठीची अधिक माहिती मिळवण्यासाठी http://bpst.nic.in/LSTPRID_Advertisement_2_2021.pdf या लिंकवर क्लिक करा.

 1. अर्ज पाठवण्याची अंतिम मुदत २५ जून २०२१ ही आहे. 
 2. अर्ज करताना उमेदवारांनी ही इंटर्नशीप करण्यामागचे उद्दिष्ट म्हणजेच स्टेटमेंट ऑफ पर्पज जवळपास २०० शब्दात लिहून पाठवावे. 
 3. निवड झालेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे कळवण्यात येणार आहे. 
 4. उमेदवारांनी आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, भाषांचे ज्ञान, जर एखादा लेख प्रकाशित झाला असेल तर त्याची माहिती आणि कॉम्प्युटर सायन्समधील कौशल्य इत्यादी माहिती देणे आवश्यक आहे.
 5. अॅप्लिकेशन फॉर्मसाठी पुढील लिंकवर क्लिक करा. http://bpst.nic.in/LSTPRID_Advertisement_2_2021.pdf

इंटर्नशीपची माहिती -

लोकसभा इंटर्नशीप २०२१ मध्ये उमेदवारांना पुढील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील.

 1. खासदार आणि त्यांच्याशी निगडीत विविध डेटा, त्यांचे काम हे एकमेकांशी जोडण्यासाठी पार्लमेंटसंबंधित अॅप विकसित करणे.
 2. उच्च दर्जाचे संशोधन पुरवणे आणि विविध विधिमंडळांचे विश्लेषण तयार करणे
 3. महत्त्वाच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा ट्रॅक ठेवणे आणि खासदारांना वापरता येतील अशा नोट्स काढणे.
 4. प्राईडच्या कार्यक्रमांसाठीच्या अभ्यासक्रमांसाठीचे दस्तावेज बनवणे, प्राईडला लॉजिस्टिक सुविधा पुरवणे, भविष्यातील वापरासाठी डेटा विश्लेषण करणे आणि डेटा अद्ययावत करणे, विविध क्षेत्रांमधील चांगल्या कार्यपद्धतींचे विश्लेषण करणे आणि नोट्स काढणे.
   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी