Love Affair : प्रेम एकाचं, धोका एकाला तरी सहा मैत्रिणींनी सोबत घेतलं विष, जाणून घ्या काय आहे प्रकरण

बिहारच्या औरंगाबादमध्ये एकामागून एक सहा मुलींनी विष प्राशन केले. मुलींनी विषारी द्रव्य प्राशन केल्याची माहिती मिळताच खळबळ उडाली होती.

Six Girl take poison for friendship
मैत्रिणींला धोका मिळताच 6 मैत्रिणींनी घेतलं विष  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तीन मुलींचा एकत्रित मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.
  • सहा मुलींमधील एका मुलीचं एक मुलासोबत प्रेम संबंध होते.

औरंगाबाद : प्रेम प्रकरणात (love affair) धोका मिळाल्यानंतर प्रियकर (Beloved) किंवा प्रेयसीनं(Lover) जीव आत्महत्या (Suicide) करणं किंवा माथेफिरू प्रेमविरांनी खून करणं ही प्रकरणे आपण वाचली असतील. परंतु तुम्ही कधी असं प्रकरण वाचलं का प्रेम एकाच, नकार एकाला मिळाल्यानं चक्क सहा मुलींनी विष घेतल्याचं ऐकलं का कधी. नाही, बिहारमधील औरंगाबादमध्ये मात्र ही विचित्र घटना घडली आहे. येथील कासमा परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून येथील सहा मुली विष प्यायल्या असून यातील तीन मुलींचा मृत्यू झाला आहे तर तीन जणांची परिस्थिती गंभीर आहे. 

तीन मुलींचा एकत्रित मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. कुटुंबातील सदस्य आक्रोश करत हंबरडा फोडत आहेत.  दरम्यान हे प्रेम प्रकरण असल्याचं तुम्ही समजला असाल, पण एकाच्या प्रेम प्रकरणात सहा मुलींनी का विष घ्यावं हे प्रकरण काही समजलं नसेल. तेच आपण जाणून घेणार आहोत... 
दरम्यान सहा मुलींमधील एका मुलीचं एक मुलासोबत प्रेम संबंध होते. मुलाने लग्नाला नकार दिल्यानं सर्व मैत्रिणींनी विष घेत सामुहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणाची अधिक माहिती देताना पोलीस अधिकारीकडून जाणून घेऊ.. 

प्रेमप्रकरणातून 6 मुलींनी खाल्लं विष

औरंगाबादचे एसपी कांतेश कुमार मिश्रा यांनी सांगितलं की, मृत झालेल्या एका मुलीचं तिच्या भावाच्या मेव्हण्यासह प्रेम संबंध होते. त्या मुलीने आपल्या मैत्रिणींना या प्रेमाची कबुली दिली आणि आपण लग्न करणार असल्याचं म्हटलं. परंतु मुलाने लग्नास नकार दिला. नकार मिळाल्यानंतर सर्व मैत्रिणींनी आपल्या गावी आल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की, ज्या मुलीला नकार मिळाला होता तिने विष घेतलं. मग काय मैत्रीसाठी बाकी मुलींनी तिला पाठिंबा देण्यासाठी एकामागून एकाने विष घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  

6 जणांनी घेतलं विष 3 जणांचा मृत्यू 

औरंगाबाद जिल्ह्यातील कसमा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे प्रकरण घडलं  आहे.  शुक्रवारी सायंकाळी सहा मैत्रिणींनी सोबत विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जणांची स्थिती गंभीर आहे. दरम्यान या तिघांवर मगध मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

3 मुलींचा मृत्यू झाल्याने गावात खळबळ

मुलींनी विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तिघांचा मृत्यू झाला. उर्वरित तिघांना उपचारासाठी मगध वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले.  जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सीओ अवधेश कुमार सिंह, एसएचओ राजगृह प्रसाद, मुख्य प्रतिनिधी अनुज कुमार सिंह घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

विष प्राशन करण्यापूर्वी मुली गुरुरूला गेल्या होत्या 

 सर्व मैत्रिणी गुरुरू येथे गेले होते व तेथून आल्यानंतर विष प्राशन केल्याचे सांगण्यात येत आहे. येथे तीन मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या रुग्णालयात आणण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी गावात तळ ठोकून आहेत. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी