काँग्रेसच्या काळात सिलेंडरचे दर जास्त होते, राहुल गांधींनी दिली कबुली

LPG Cylinder prices were high during the Congress period confessed Rahul Gandhi : घरी स्वयंपाक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलेंडरची किंमत मोदी सरकारच्या काळात कमी आहे आणि काँग्रेसच्या काळात जास्त होती, अशा स्वरुपाची कबुली काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिली आहे.

LPG Cylinder prices were high during the Congress period confessed Rahul Gandhi
काँग्रेसच्या काळात सिलेंडरचे दर जास्त होते, राहुल गांधींनी दिली कबुली  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • काँग्रेसच्या काळात सिलेंडरचे दर जास्त होते, राहुल गांधींनी दिली कबुली
  • २०१४ मध्ये काँग्रेस सरकार केंद्रात सत्तेत होते त्यावेळी एका सिलेंडरसाठी १२३७ रुपये
  • मोदी सरकारच्या काळात आजच्या घडीला राहुल गांधी यांच्याच म्हणण्यानुसार ९९९ रुपयांत सिलेंडर उपलब्ध

LPG Cylinder prices were high during the Congress period confessed Rahul Gandhi : नवी दिल्ली : घरी स्वयंपाक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलेंडरची किंमत मोदी सरकारच्या काळात कमी आहे आणि काँग्रेसच्या काळात जास्त होती, अशा स्वरुपाची कबुली काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिली आहे. एक ट्वीट करून राहुल गांधी यांनी नकळत ही कबुली दिली आहे.

नागपुरात सुरू झाले आयआयएम

डोंबिवलीत तलावात एकाच कुटुंबीयातील पाच जणांचा बुडून मृत्यू

पालघरमध्ये स्टीलच्या कारखान्यात हिंसा, १९ पोलीस जखमी

Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात १३०४ कोरोना Active, आज २२४ रुग्ण, १ मृत्यू

मोदी सरकारवर टीका करण्यासाठी राहुल गांधी यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०१४ मध्ये काँग्रेस सरकार केंद्रात सत्तेत होते त्यावेळी एका सिलेंडरसाठी नागरिक ४१० रुपये मोजत होते आणि सरकारी सवलत (सबसिडी) ८२७ रुपये होती. पण आज मोदी सरकारच्या काळात एका सिलेंडरसाठी नागरिक ९९९ रुपये मोजत आहेत आणि सरकारी सवलत (सबसिडी) शून्य रुपये आहे. पण हे ट्वीट करून राहुल गांधी यांनी स्वतःच्या पक्षाचे नुकसान करून घेतल्याचे चित्र आहे.

अनेक सोशल मीडिया युझर राहुल गांधी यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देत आहेत. ट्वीट करण्याचा नादात राहुल गांधी यांनी नकळतपणे काँग्रेसच्या काळात सिलेंडर महाग होता याची जाहीर कबुली दिल्याचे अनेकजण सोशल मीडियावर सांगत आहेत. 

राहुल गांधी यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेस सरकार असताना सिलेंडरची किंमत म्हणजे नागरिक देत असलेले ४१० रुपये अधिक सरकारी सवलतीचे ८२७ रुपये एकूण १२३७ रुपये होतात. याचा अर्थ काँग्रेसच्या काळात सिलेंडरची किंमत १२३७ रुपये होती. या उलट भाजपच्या काळात ९९९ रुपयांत सिलेंडर उपलब्ध आहे.

सबसिडी नको योजना आणि उज्ज्वला योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्यांना एलपीजी सबसिडी हवी की नको हे सांगण्याचे आवाहन केले होते. विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेला प्रतिसाद देत अनेकांनी सबसिडी नाकारली होती. यामुळे एलपीजी सिलेंडर घेणाऱ्या सबसिडीधारकांच्या संख्येत घट झाली होती. केंद्र सरकारने आधारकार्ड क्रमांक आणि एलपीजी सबसिडी  सिलेंडर धारकाच्या बँक खात्याशी जोडून सबसिडीचे पैसे थेट खात्यात जमा करणे सुरू केले. यामुळे भ्रष्टाचार कमी झाला. सबसिडीचे पैसे लवकर मिळू लागले. सरकारने सबसिडीच्या वाचलेल्या पैशांचा वापर देशहिताच्या इतर कामांसाठी सुरू केल्याचे जाहीर केले. यानंतर सिलेंडर निर्मितीचे प्रमाण वाढले. काँग्रेसच्या काळात अस्तित्वात नसलेली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (Pradhan Mantri Ujjwala Yojana) २०१६ मध्ये सुरू झाली. दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक कुटुंबाला सिलेंडर मिळण्यास सुरुवात झाली. मोदी सरकारच्या काळात सिलेंडर निर्मितीचे प्रमाण वाढले. पुरवठ्याचे प्रमाण वाढले. एवढे सगळे होऊनही सिलेंडर ९९९ रुपयांत उपलब्ध आहे. याउलट काँग्रेसच्या काळात अनेकांची सिलेंडर लवकर मिळत नाही ही तक्रार होती आणि राहुल गांधी यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार सिलेंडर १२३७ रुपयांत मिळत होता. 

सारांश

काँग्रेसच्या काळात १२३७ रुपयांत सिलेंडर मिळत होता. पण देशातील अनेक भागांची सिलेंडर लवकर मिळत नाही ही तक्रार होती. मोदी सरकारच्या काळात आजच्या घडीला राहुल गांधी यांच्याच म्हणण्यानुसार ९९९ रुपयांत सिलेंडर उपलब्ध आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी