New Army chief | लेफ्टनंट जनरल मनोज पांडे देशाचे नवे लष्करप्रमुख...हे पद भूषवणारा पहिला इंजिनियर

Army Chief : भारताच्या लष्करप्रमुखपदाची जबाबदारी आता नवीन खाद्यांवर देण्यात आली आहे. केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची भारतीय लष्कराचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. जनरल मनोज पांडे 1 मे, 2022 रोजी लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारतील. यात महत्त्वाची बाब म्हणजे लष्करप्रमुख होणारे मनोज पांडे हे अभियंता कॉर्प्सचे पहिले अधिकारी असतील. संरक्षण मंत्रालयाने या महत्त्वाच्या नियुक्तीची घोषणा केली आहे

Lt Gen Manoj Pande appointed as Army chief
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे भारताचे नवे लष्करप्रमुख 
थोडं पण कामाचं
  • लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची भारतीय लष्कराचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
  • 1 मे, 2022 रोजी लष्करप्रमुखपदाचा लेफ्टनंट जनरल मनोज पांडे पदभार स्वीकारणार
  • जनरल मनोज मुकुंद नरवणे हे 30 एप्रिल रोजी निवृत्त होणार

Lt Gen Manoj Pande appointed as Army chief : नवी दिल्ली  : भारताच्या लष्करप्रमुखपदाची (Chief of Army Staff) जबाबदारी आता नवीन खाद्यांवर देण्यात आली आहे. केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल मनोज पांडे (Lt Gen Manoj Pande)यांची भारतीय लष्कराचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.  जनरल मनोज पांडे 1 मे, 2022 रोजी लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारतील. यात महत्त्वाची बाब म्हणजे लष्करप्रमुख होणारे मनोज पांडे हे अभियंता कॉर्प्सचे पहिले अधिकारी असतील. संरक्षण मंत्रालयाने या महत्त्वाच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. (Lt Gen Manoj Pande is appointed as Army chief of India, he is first engineer to get the prestigious post)

अधिक वाचा : Sri Lanka Update | विस्तारखोर चीनला भारताचा श्रीलंकेत दणका! दिवाळखोर लंकेतील 3 ऊर्जा प्रकल्पांमध्ये भारत 'इन' तर चीन 'आउट'...

30 एप्रिल जनलर नरवणे होणार निवृत्त

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे जनरल मनोज मुकुंद नरवणे (General Manoj Mukund Naravane) यांच्याकडून लष्करप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. जनरल मनोज मुकुंद नरवणे हे 30 एप्रिल रोजी आपला 28 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत. त्यानंतर ही जबाबदारी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्याकडे येणार आहे. "सरकारने लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे," असे संरक्षण मंत्रालयाने सोमवारी जाहीर केले.

अधिक वाचा : Sweden Riots : स्वीडनमध्ये कुराण जाळल्याने उसळली दंगल, सौदी अरेबियाने केला निषेध

एनडीचे विद्यार्थी आहेत जनरल पांडे

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे (NDA) माजी विद्यार्थी आहेत. डिसेंबर 1982 मध्ये त्यांची अभियंता कॉर्प्समध्ये नियुक्ती झाली होती. लष्कराच्या महत्त्वाच्या ऑपरेशन पराक्रमच्या वेळेस त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील पल्लनवाला सेक्टरमध्ये जिनियर रेजिमेंटचे नेतृत्व केले होते. ऑपरेशन पराक्रम ही पश्चिम सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि शस्त्रे जमा करण्याची मोहिम होती. डिसेंबर 2001 मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर आले होते. त्यावेळेस लष्कराने ऑपरेशन पराक्रम मोहिम राबवली होती.

अधिक वाचा : MP Harbhajan Singh : खासदार होताच हरभजन सिंगची कमाल; शेतकऱ्यांच्या मुलींसाठी घेतला मोठा निर्णय, सर्वजण करताय कौतुक

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची कारकीर्द

आपल्या 39 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत लेफ्टनंट जनरल पांडे यांनी वेस्टर्न थिएटरमध्ये इंजिनियर ब्रिगेड, एलओसीवर पायदळ ब्रिगेड, लडाख सेक्टरमधील माउंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे.लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी पूर्व कमांडची म्हणजे लष्कराच्या पूर्वी विभागाची जबाबदारीदेखील सांभाळली आहे. या जबाबदारी आधी ते अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ देखील होते.

लेफ्टनंट जनरल पांडे यांच्या रुपाने भारताला आणखी एक अनुभवी आणि कार्यक्रम लष्करप्रमुख मिळाला आहे. आगामी काळात लेफ्टनंट जनरल पांडे यांना चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवर भारतापुढे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्याची जबाबदारी असणार आहे. 

जनरल मनोज नरवणे यांना आपल्या कार्यकाळात चीनच्या कुरापतींना तोंड द्यावे लागले आहे. या काळात देशाच्या लष्कराने चीनला चोख उत्तर दिले आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी