लुधियाना न्यायालयात Bomb Blast करणाऱ्या मास्टरमाईंडला जर्मनीत अटक; मुंबईत करायाचा होता दहशतवादी हल्ला

पंजाबमधील (Ludhiana,) लुधियाना येथील न्यायालयात (Court) झालेल्या स्फोटाप्रकरणी (Bomb Blast) जर्मनीहून (Germany) एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंडचं (Mastermind) नाव जसविंदर सिंग मुल्तानी (Jaswinder Singh Multani) असून याला जर्मनीतून अटक करण्यात आली आहे.

Ludhiana court bomb blast Mastermind arrested for in Germany
लुधियानामधील न्यायालयात Blast करणाऱ्याला जर्मनीत अटक   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुल्तानी ISI च्या सूचनेनुसार काम करत होता.
  • जर्मनीमध्ये पोलिसांनी बंदी घातलेल्या शिख फॉर जस्टिस (SFJ) या संघटनेशी जसविंदर सिंग मुल्तानी संबंधित.
  • जसविंदर सिंग दिल्ली आणि मुंबईतही दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची योजना आखत होता.

जर्मनी :  (Punjab))पंजाबमधील (Ludhiana,) लुधियाना येथील न्यायालयात (Court) झालेल्या स्फोटाप्रकरणी (Bomb Blast) जर्मनीहून (Germany) एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंडचं (Mastermind) नाव जसविंदर सिंग मुल्तानी (Jaswinder Singh Multani) असून याला जर्मनीतून अटक करण्यात आली आहे. भारत सरकारने (Government of India) जर्मनी सरकारला (Government of Germany) विनंती केली होती. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुल्तानी ISI च्या सूचनेनुसार काम करत होता. जसविंदर सिंग हा लुधियाना न्यायालयात बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे. तसेच धक्कादायक म्हणजे जसविंदर सिंग दिल्ली आणि मुंबईतही दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची योजना आखत होता, अशी माहिती समोर आली आहे. याच आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.जर्मनीमध्ये पोलिसांनी बंदी घातलेल्या शिख फॉर जस्टिस (SFJ) या संघटनेशी संबंधित दहशतवादी जसविंदर सिंग मुल्तानी (Jaswinder Singh Multani)याला अटक केली आहे. 45 वर्षीय जसविंदर सिंग हा एसएफजेचे संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नू याच्या जवळचा मानला जातो. जसविंदरवर फुटीरतावादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोपही आहे.

जसविंदर सिंग मुल्तानी याने सिंघू सीमेवर शेतकरी नेते बलवीर सिंग राजेवाल (Balveer Singh Rajewal) यांच्या हत्येचा कट रचला होता. यासाठी त्याने जीवन सिंग नावाच्या व्यक्तीला भडकावले होते. हत्येसाठी लागणारे हत्यारं मध्य प्रदेशातील जीवन सिंग याने दिले होते. मात्र, त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं जीवन सिंगला अटक केली होती. सुत्रांनी सांगितले की, पहिल्यांदाच मुल्तानीचे नाव एखाद्या प्रकरणात स्पेशल सेलसमोर आले होते. विशेष कक्षाने ही माहिती केंद्रीय यंत्रणांना दिली होती.

गुरुवारी लुधियाना न्यायालयाच्या आवारात स्फोट झाल्याची घटना घडली. त्यात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. न्यायालयाच्या कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावरील टॉयलेटमध्ये हा स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते. त्यावेळी जिल्हा न्यायालयाचे कामकाज सुरू होते. कोर्ट कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर झालेल्या स्फोटात कंपाऊंडच्या भिंतीचे नुकसान झाले आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या काही वाहनांच्या काचा फुटल्या होत्या.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी