चीनमधील जुगाराच्या राजधानीत कोरोनामुळे कॅसिनो एका आठवड्यासाठी बंद

macau : shutdown in casino due to covid19 : मकाउ (macau) हे शहर चीनमधील जुगाराची राजधानी म्हणून ओळखले जाते. कोरोना संकटामुळे या मकाउमध्ये एका आठवड्यासाठी सर्व जुगाराची केंद्र, कॅसिनो बंद करण्यात आले आहेत.

macau : shutdown in casino due to covid19
चीनमधील जुगाराच्या राजधानीत कोरोनामुळे कॅसिनो एका आठवड्यासाठी बंद  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • चीनमधील जुगाराच्या राजधानीत कोरोनामुळे कॅसिनो एका आठवड्यासाठी बंद
  • मकाउ शहरात शनिवार ९ जुलै २०२२ रोजी कोरोनाचे ७१ नवे रुग्ण आढळले
  • मकाउमध्ये निर्बंध लागू करून कोरोना संकट नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू

macau : shutdown in casino due to covid19 : मकाउ (macau) हे शहर चीनमधील जुगाराची राजधानी म्हणून ओळखले जाते. कोरोना संकटामुळे या मकाउमध्ये एका आठवड्यासाठी सर्व जुगाराची केंद्र, कॅसिनो बंद करण्यात आले आहेत. जे अत्यावश्यक गटात येत नाहीत असे अनेक व्यवसाय पण एका आठवड्यासाठी बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाने सोमवार ११ जुलै २०२२ पासून मकाउमध्ये सर्व जुगाराची केंद्र, कॅसिनो आदी एका आठवड्यासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संकट असल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये; असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.

भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात १३ हजार कोटींच्या घरात

मकाउ शहरात शनिवार ९ जुलै २०२२ रोजी कोरोनाचे ७१ नवे रुग्ण आढळले होते. मकाउमध्ये आतापर्यंत आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या चीन सरकारने दिलेल्या माहितीनुसार १३७४ झाली आहे. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार मकाउमध्ये कोरोना संकटाची तीव्रता अद्याप कमी आहे पण मागील काही दिवसांत वाढलेली कोरोनाची तीव्रता चिंताजनक आहे. याच कारणामुळे मकाउमध्ये निर्बंध लागू करून कोरोना संकट नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 

मकाउतील एकूण सरकारी उत्पन्नापैकी ८० टक्के उत्पन्न हे कॅसिनोमधून येते. यामुळे कॅसिनो बंद करण्याने मकाउच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. मकाउमधील अत्यावश्यक सेवा सुरू राहतील पण इतर सर्व आस्थापने एक आठवडा बंद राहणार आहेत. कोरोना संकट नियंत्रणात आले नाही तर कारभार बंद ठेवण्याचा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

मकाउमधील अनेक इमारती सील करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने शनिवार ९ जुलै पर्यंत हजारो नगरिकांना क्वारंटाइन केले होते. या संख्येत पुढील काही दिवसांत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

कोरोना संकटाला सुरुवात झाली त्यावेळी मकाउमध्ये परिस्थिती एवढी गंभीर झाली नव्हती. पण यावेळी मकाउमध्ये कोरोना संकट वेगाने पसरण्याचा धोका आहे. यामुळे प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. 

चीनमध्ये जुगारावर बंदी आहे पण मकाउ या चिनी शहरात जुगार खेळण्यावर बंदी नाही. जुगारासाठी प्रसिद्ध असलेले मकाउ हे जुगाराच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील लोकप्रिय केंद्रांपैकी एक आहे. एका अहवालानुसार आंतरराष्ट्रीय पातळीवर जुगारासाठी लोकप्रिय असलेल्या अव्वल तीन शहरांमध्ये मकाउ या शहराचा समावेश होतो. जुगारासाठी एवढे लोकप्रिय असलेल्या मकाउमध्ये कोरोनामुळे जुगारच बंद करण्याची वेळ आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी