made-in-India kit : आत्मनिर्भर भारतात स्वदेशी किटने होणार ओमायक्रॉन आरटीपीसीआर चाचणी

made-in-India kit to detect omicron covid variant : आत्मनिर्भर भारत या मोहिमेत आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात देश यशस्वी झाला आहे. लवकरच भारतात स्वदेशी किटद्वारे ओमायक्रॉन आरटीपीसीआर चाचणी सुरू होईल. 

made-in-India kit to detect omicron covid variant
स्वदेशी किटने होणार ओमायक्रॉन आरटीपीसीआर चाचणी 
थोडं पण कामाचं
  • आत्मनिर्भर भारतात स्वदेशी किटने होणार ओमायक्रॉन आरटीपीसीआर चाचणी
  • टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स लिमिटेड या मुंबईतील कंपनीने तयार केले किट
  • चार तासांत रिपोर्ट मिळणार

made-in-India kit to detect omicron covid variant : नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत या मोहिमेत आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात देश यशस्वी झाला आहे. लवकरच भारतात स्वदेशी किटद्वारे ओमायक्रॉन आरटीपीसीआर चाचणी सुरू होईल. 

टाटा समुहातील टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स लिमिटेड या मुंबईतील कंपनीने आयसीएमआरच्या (Indian Council of Medical Research - ICMR) सहकार्याने ओमायक्रॉन आरटीपीसीआर चाचणीचे किट (TATA MD CHECK RT-PCR OmiSure) विकसित केले आहे. या किटद्वारे चाचणी घेऊन एखाद्या व्यक्तीला ओमायक्रॉनची बाधा झाली आहे की नाही हे शोधणे अतिशय सोपे आहे. ओमायक्रॉन आरटीपीसीआर किटद्वारे घेतलेल्या नमुन्याची तपासणी करुन अवघ्या चार तासांत निष्कर्ष देणे शक्य आहे. यामुळे रुग्णाला ओमायक्रॉनची बाधा झाली असल्यास तातडीने उपचार घेणे शक्य होईल. 

स्वदेशी किटला डीसीजीआयने (Drugs Controller General of India - DCGI) परवानगी दिली आहे. यामुळे लवकरच हे किट वापरणे शक्य होईल. देशभर किटचा पुरवठा करण्यासाठी टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स लिमिटेड नियोजन करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी