दोन वर्षाच्या भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन बसला चिमुकला, वडील शोधत राहिले रूग्णवाहिका

एक 8 वर्षांचा मुलगा आपल्या 2 वर्षांच्या लहान भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन बसला होता. तर या मुलाचे वडील पूजाराम जाटव मृत मुलाचा मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका शोधत होते.

Madhya pradesh News
मृतदेह मांडीवर घेऊन बसला चिमुकला   |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • मध्य प्रदेशातल्या मुरैना येथील एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.
  • एक 8 वर्षांचा मुलगा आपल्या 2 वर्षांच्या लहान भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन बसला होता.
  • या मुलाला अशा अवस्थेत बसलेलं पाहून नागरिकांनी त्याच्या आजूबाजूला एकच गर्दी केली.

मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातल्या मुरैना येथील एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एक 8 वर्षांचा मुलगा आपल्या 2 वर्षांच्या लहान भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन बसला होता. तर या मुलाचे वडील पूजाराम जाटव मृत मुलाचा मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका शोधत होते. हा मुलगा रस्त्याच्या कडेला आपल्या भावाचा मृतदेह घेऊन बसला होता. या मुलाला अशा अवस्थेत बसलेलं पाहून नागरिकांनी त्याच्या आजूबाजूला एकच गर्दी केली आणि अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली. 

ही घटना मुरैना जिल्ह्यातल्या अंबा येथील बडफरा गावातील आहे. पूजाराम जाटव यांचा दोन वर्षांचा मुलगा राजा याची प्रकृती अचानक बिघडली होती. आधी पूजारामने आपल्या मुलाला घरीच उपचार करून ठिक करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोटदुखी असह्य झाल्यानं त्यांनी मुलाला मुरैना जिल्हा रुग्णालयात नेलं. त्यांचा मोठा मुलगा गुलशनही पूजारामसोबत रुग्णालयात गेला होता. मात्र दुर्देव असं की, मुरैना जिल्हा रूग्णालयात राजा याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

अधिक वाचा-  विजय मल्ल्याला धक्का; तुरूंगवासासह ठोठावला दंड, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

यानंतर पुजाराम याची परिस्थिती खूप गरीब आहे. म्हणून असहाय झालेल्या पूजारामनं रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडे मुलाचा मृतदेह परत गावी नेण्यासाठी रूग्णवाहिकेची व्यवस्था करण्याची विनंती केली. मात्र रूग्णालयाकडून त्यासाठी नकार मिळाला. रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी पूजारामची रूग्णवाहिकेची विनंती नाकारली म्हणून त्यानं आपल्या मुलाचा मृतदेह रूग्णालयामधून बाहेर आणला आणि रस्त्यावर बसला. 

पूजाराम जाटव यांच्याकडे नव्हते पैसे 

पूजाराम जाटव यांचं पंक्चरचं दुकानं आहे. त्यांना मुलाचा मृतदेह नेण्यासाठी रूग्णालयातून एकही वाहनं मिळालं नाही. तर दुसऱ्या वाहनातून मृतदेह घेऊन जाण्यासाठी पैसेही नव्हते. त्यानंतर त्रस्त झालेल्या वडिलांकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नाही तेव्हा त्यांनी मोठा मुलगा गुलशनला मृतदेहासह रूग्णालयाच्या बाहेर सोडण्याचा निर्णय घेतला आणि जेणेकरून दुसरा पर्यायी मार्ग शोधून तो पुन्हा घरी परत जाऊ शकेल.

रस्त्यावर भावाच्या मृतदेहासोबत बसलेला मोठा भाऊ

पुजारामचा मोठा मुलगा गुलशन आपल्या मृत भावाचे डोके त्याच्या मांडीवर घेऊन अर्धा तास तिथे बसून होता. वडिलांच्या परत येण्याच्या आशेनं तो रूग्णालयाच्या बाहेर बसला होता. हे चित्र पाहून तिथे एकच गर्दी जमली. त्यानंतर जमा झालेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. याची माहिती दिल्यावर पोलिसांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आणि चालकाला पूजाराम जाटव यांच्या घरी जाण्यास सांगितलं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी