Auction of Sarpanch post: ४४ लाखांची बोलीने निवडला गेला सरपंच, पाहा कुठे घडली घटना

भारतात लोकशाही मार्गाने निवडणूका होतात आणि नागरिक आपले लोकप्रतिनिधी निवडतात. परंतु एका ग्राम पंचायतमध्ये लाखो रुपयांची बोली लावून सरपंचपदाचा लिलाव करण्यात आला आहे. तसेच ज्या व्यक्तीने या लिलावाला सर्वाधिक किंमत लावली आहे तो सरपंचपदी निवडून आला आहे. madhya pradesh auction of sarpanch post 44 lakh

auction
लिलाव 
थोडं पण कामाचं
  • भारतात लोकशाही मार्गाने निवडणूका होतात
  • ग्राम पंचायतमध्ये लाखो रुपयांची बोली लावून सरपंचपदाचा लिलाव
  • लिलावातील रक्कम गावाच्या विकासासाठी खर्च केली जाईल

Auction of Sarpanch post:  भोपाळ : भारतात लोकशाही मार्गाने निवडणूका होतात आणि नागरिक आपले लोकप्रतिनिधी निवडतात. परंतु एका ग्राम पंचायतमध्ये लाखो रुपयांची बोली लावून सरपंचपदाचा लिलाव करण्यात आला आहे. तसेच ज्या व्यक्तीने या लिलावाला सर्वाधिक किंमत लावली आहे तो सरपंचपदी निवडून आला आहे. मध्य प्रदेशमधील ही धक्कादायक घटना असून लिलावातील रक्कम गावाच्या विकासासाठी खर्च केली जाईल अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंचाने व्यक्त केली आहे.(madhya pradesh auction of sarpanch post 44 lakh) 


मध्य प्रदेशमध्ये अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थासाठी मतदान झालेले नाही. असे असले तरी मध्य प्रदेशच्या भटौली ग्राम पंचायतीच्या ग्रामस्थांनी आपल्या सरपंचाची बिनविरोध निवड केली आहे. मंगळवारी ग्रामस्थांची राधा कृष्ण मंदिरात बैठक पार पाडली. या बैठकीत गावातील सर्व लोक उपस्थित होते. तेव्हा सरपंचपदासाठी बोली लागली. तेव्हा सौभाग सिंह यादव यांनी सरपंचपदासाठी तब्बल ४४ लाख रुपयांची बोली लावली. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी सौभाग सिंह यांची बिनविरोध सरपंचपदी निवड केली. भटौली ग्राम पंचायत चंदेरी जनपद अंतर्गत आहे. या भागात तिसर्‍या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. यासाठी अजून नामांकन प्रक्रियाही सुरू झाली नव्हती. त्यापूर्वीच मंगळवारी ग्रामस्थांनी आपल्या सरपंचाची निवड केली आहे. 

बोली लावणार्‍याने आधी पाच हजार रुपये जमा करणे बंधनकारक होते. सरपंचपदासाठी चार जणांनी बोली लावली होती. २१ लाख रुपयांना पहिली बोली लागली. तेव्हा चार जणांनी ही बोली वाढवत ४० लाख रुपयांच्या घरात नेली. नंतर बोली ४३ लाख रुपयांपर्यंत पोहोचली. तेव्हा सौभाग सिंह यादव यांनी सरपंचपदासाठी ४४ लाख रुपयांची बोली लावली. दुपारी एक वाजेपर्यंत लिलाव सुरू होता. अखेर ग्रामस्थांनी सौभाग सिंह यांची सरपंचपदी बिनविरोध निवड केली आणि त्यांच्याविरोधात कुणीही निवडणूक लढवणार नाही असा ठराव मंजूर करण्यात आला.

सरपंचपदासाठी ४४ लाख रुपयांची बोली लागली. हे पैसे गावातील मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी आणि  गावाच्या विकासासाठी वापरले जाईल अशी माहिती सरपंच सौभाग सिंह यांनी दिली. सौभाग सिंह यांनी जर ही रक्कम आज सांयकाळपर्यंत जमा नाही केली तर त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्ध्याला सरपंचपद दिले जाईल. गावात भांडण तंटे होऊ नये म्हणून अशा प्रकारे सरपंच निवडला गेला अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी