या मुख्यमंत्र्यांवर कविता चोरीचा आरोप

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 02, 2020 | 14:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक कविता शेअर केली होती आणि सांगितले होते की ही कविता त्यांची पत्नी साधना यांनी लिहिली आहे. त्यानंतर यांच्यावर चोरीचा आरोप करण्यात आला आहे. 

shivraj singh chouhan
या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर कविता चोरीचा आरोप 

थोडं पण कामाचं

  • मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री चौहान यांच्यावर चोरीचा आरोप
  • सोशल मीडियावरील कविता चोरल्याचा केलाय आरोप
  • काँग्रेसने केली जोरदार टीका

भोपाळ: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान(madhya pradesh cm shivraj singh chouhan) यांनी आपल्या सासऱ्यांच्या निधनानंतर ट्वीटरवर पोस्ट(tweet) केलेल्या कवितेवरून(poem) काँग्रेसने(congress)त्यांच्यावर निशाणा साधला आहे. खरंतर चौहान यांनी बाबुजी हे शीर्षक असलेली एक कविता पोस्ट केली होती आणि सांगितले होते की ही कविता त्यांची पत्नी साधना यांनी लिहिली आहे. यात त्यांनी आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतरच्या भावना व्यक्त केल्या होता. यातच बिरथरे नावाच्या मीडियाकर्त्याने चौहान यांची पोस्ट केलेली कविता ही स्वत: केल्याचा दावा केला आहे. यावर प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अरूण यादव यांनी म्हटले की भाजप नाव बदलण्यात हुशार आहे आणि ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली. 

चौहान यांच्या सासऱ्यांचे निधन १९ नोव्हेंबरला झाले होते. त्यानंतर २२नोव्हेंबरला त्यांनी ही कविता पोस्ट केली होती आणि म्हटले की माझी धर्मपत्नी स्व. बाबूजी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कवितेच्या काही ओळी - ‘पिरोया’ है- जिसके कंधे पर बैठकर घूमा करती थी, उसे कंधा देकर आयी हूं....।’

यानंतर पत्रकार असल्याचा दावा करणाऱ्या एका तरूणीने ३० नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांना तक्रारीच्या सुरात ट्वीट केले, सर भाची आहे मी तुमची. माझी कविता चोरून तुम्हाला काय मिळणार? ही कविता मी लिहिली आहे. आशा आहे की तुम्ही माझ्या अधिकारांचे उल्लंघन करणार नाही. मामा तर अधिकारांचे रक्षण करणारे असतात. चौहान यांना राज्यात मामा म्हटले जाते. 

चौहान यांच्याशिवाय भूमिकाने पंतप्रधान नरेंद्रमोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह अनेक नेत्यांना हे पोस्ट केले आहे. भूमिकाने असाही दावा केला आहे की तिने मुख्यमंत्र्यांच्या आधी २० नोव्हेंबरला सोशल मीडियावर डॅडी नावाने लिहिलेली आपली कविता पोस्ट केली होती. 

भूमिकाने फेसबुकवर लिहिले की, प्रिय मामा तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. एक मामाच आपल्या भाचीच्या कवितांच्या भावना समजू शकतो. पण तुम्ही तर ही कविता धर्मपत्नीच्या नावे दिलीत. मला आशा आहे की तुम्ही तुमची चूक स्वीकाराल. भूमिकाने एक डिसेंबरला फेसबुकवर केलेल्या व्हिडिओ पोस्ट करत दावा केला आहे की तिला पोलिसांचे फोन येत आहे आणि तिचे ठिकाण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. भूमिकाने सुरक्षेची मागणी केली आहे. 

यातच काँग्रेस नेता अरूण यादव यांनी ट्विट करत म्हटले की भाजप नाव बदलण्यात हुशार आहे. ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली. याआधी काँग्रेसच्या योजनांची नावे बदलण्यात आली. त्यानंतर शहरांची नावे बदलण्यात आली. आता मुख्यमंत्री शिवराज सिंह तर दुसऱ्याने लिहिलेली कविता आपल्या धर्मपत्नीने लिहिल्याचे सांगितले, वा शिवाराजजी वा. 

काँग्रेसचे वरिष्ठ नेता केके मिश्रा यांनी भूमिकेची पोसट टाकताना चौहान यांच्याकडून या कवितेला आपल्या पत्नीचे नाव दिल्यावरून सवाल उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे सासरे घनश्याम दास मसानी यांचे १९ नोव्हेंबरला निधन झाले होते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी