विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारे वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू, 11 जण जखमी

मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील उन्हेल शहरातील झिरन्या फाट्याजवळ सोमवारी  शाळकरी मुलांना घेऊन जाणारी जीप आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार विद्यार्थी ठार तर 11 जण जखमी झाले.

madhya pradesh four students killed 11 others injured in a collision between a vehicle and a truck carrying children to school
ट्रकच्या धडकेत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू, 11 जखमी 
थोडं पण कामाचं
  • मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील उन्हेल शहरातील झिरन्या फाट्याजवळ सोमवारी  शाळकरी मुलांना घेऊन जाणारी जीप आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघात
  • चार विद्यार्थी ठार तर 11 जण जखमी झाले.
  • उन्हेल शहरातील झिरन्या फाट्याजवळ सकाळी ७ वाजता शाळकरी मुले नागदा येथील फातिमा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जीपमधून जात असताना हा अपघात झाला.

उज्जैन :  मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील उन्हेल शहरातील झिरन्या फाट्याजवळ सोमवारी  शाळकरी मुलांना घेऊन जाणारी जीप आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार विद्यार्थी ठार तर 11 जण जखमी झाले. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. (madhya pradesh four students killed 11 others injured in a collision between a vehicle and a truck carrying children to school)

अधिक वाचा : 'आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का?', अजितदादा संतापले

उज्जैनचे पोलीस अधीक्षक (एसपी) सत्येंद्र शुक्ला यांनी सांगितले की, उन्हेल शहरातील झिरन्या फाट्याजवळ सकाळी ७ वाजता शाळकरी मुले नागदा येथील फातिमा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जीपमधून जात असताना हा अपघात झाला. या अपघातात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर 11 जण जखमी झाले, असे त्यांनी सांगितले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी विद्यार्थी जीपमध्ये अडकले असून त्यांना पोलीस आणि स्थानिक लोकांनी अथक प्रयत्नानंतर बाहेर काढले.

अधिक वाचा : या 4 गोष्टी आहेत हृदयाच्या शत्रू..येईल हृदयविकाराचा झटका

जखमींपैकी तीन विद्यार्थ्यांना इंदूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इतरांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांचे वय सहा ते १८ वर्षांच्या दरम्यान असल्याचे शुक्ला यांनी सांगितले. ट्रक आणि जीप चालकांना ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी नंतर एका निवेदनात म्हटले आहे की ज्या जीपमध्ये विद्यार्थी प्रवास करत होते ती शाळेची नव्हती आणि पालकांनी त्यांच्या मुलांची वाहतूक करण्यासाठी ती भाड्याने घेतली होती.

अधिक वाचा : सापाशी खेळणे पडले महागात, पहा हा धक्कादायक व्हायरल व्हिडीओ

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी