MP Honey Trap: देशातील सर्वात मोठे सेक्स स्कँडल, ४ हजार व्हीआयपींच्या फाइल्समध्ये सापडलं असं काही 

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 26, 2019 | 18:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

सेक्स स्कँडल संबंधीत ४ हजार फाइल्स पोलिसांच्या ताब्यात आल्या आहेत. यामुळे मध्यप्रदेशात हे हनी ट्रॅप रॅकेटचा खुलासा झाला आहे.  हे देशातील मोठे ब्लॅकमेलिंग सेक्स स्कँडल अशी याची आता ओळख झाली आहे.

madhya pradesh honey trap scandal becomes the country largest sex scandal news in marathi
MP Honey Trap: देशातील सर्वात मोठे सेक्स स्कँडल, ४ हजार व्हीआयपींच्या फाइल्समध्ये सापडलं असं काही  

थोडं पण कामाचं

  • सेक्स स्कँडल संबंधीत ४ हजार फाइल्स पोलिसांच्या ताब्यात आल्या आहेत.
  • मध्यप्रदेशात हा हनी ट्रॅप रॅकेटचा खुलासा झाला आहे.
  • हे देशातील मोठे ब्लॅकमेलिंग सेक्स स्कँडल अशी याची आता ओळख झाली आहे.

भोपाळ :  सेक्स स्कँडल संबंधीत ४ हजार फाइल्स पोलिसांच्या ताब्यात आल्या आहेत. यामुळे मध्यप्रदेशात हा हनी ट्रॅप रॅकेटचा खुलासा झाला आहे.  हे देशातील मोठे ब्लॅकमेलिंग सेक्स स्कँडल अशी याची आता ओळख झाली आहे. या फाइल्समध्ये बड्या अधिकाऱ्यांचे न्यूड व्हिडिओ, सेक्स चॅट आणि ऑडिओ क्लिप्स आहेत. या फाइल्स पोलिसांच्या हाती लागल्याने अनेक पक्षाचे मोठे नेते, अधिकारी आणि व्यापाऱ्यांना घामटा फुटला आहे. 

मध्य प्रदेशातील सर्वात मोठ्या सेक्स स्कँडलचा खुलासा झाल्यावर अनेकांची झोप उडाली आहे. हनी ट्रॅप लावून सेक्स चॅट, सेक्स करताना अधिकाऱ्याचे व्हिडिओ आणि महिलांशी या व्हीआयपी लोकांच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप्सही ४ हजार फाइल्समध्ये सापडल्या आहेत.  यात बी ग्रेड सिनेमातील काम करणाऱ्या काही अभिनेत्रींचा सेक्स स्कँडलमध्ये समावेश आहे. तसेच या हनी ट्रॅप आणि सेक्स स्कँडलची व्याप्ती केवळ मध्यप्रदेशात नाही तर इतर चार राज्यांमध्येही पसरली आहे. काही हाय प्रोफाइल अधिकारी आणि मध्यप्रदेशातील काही मोठे नेतेही हनी ट्रॅपचे शिकार झाले आहेत. 

सध्या मध्य प्रदेश पोलिसांची चौकशीचे काम सुरू आहे. यात ते या ४ फाइल्समध्ये मिळालेले व्हिडिओज, मेमरी कार्ड आणि छायाचित्रांची छानणी आणि तपासणी करत आहेत. यात मध्यप्रदेशच्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटला जास्त काम करावे लागत आहे. टाइम्स ग्रूपने दिलेल्या वृत्तानुसार 

असा रचला जायचा हनी ट्रॅप

सोशल मीडियाचा वापर करून वरिष्ठ अधिकारी आणि नेत्यांना मुली आणि महिला जाळ्यात गोवत होत्या. तसेच सुंदर तरूणींना या नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या घरी किंवा फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये पाठवले जात होते. छुप्या कॅमेऱ्यांच्या मदतीने मुली या अधिकाऱ्याचे आणि नेत्यांचे न्यूड व्हिडिओ शूट करत होत्या. त्यानंतर या सर्वांना ब्लॅकमेल करण्यात येत होते. इंदूर येथील एका नगरपालिकेच्या इंजिनिअरने तक्रार केली त्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे उघडकीस आले आहेत. हनी ट्रॅप घडवून आणणाऱ्या पाच महिलांना इंदूर आणि भोपाळ या ठिकाणांहून अटक करण्यात आली आहे. 

इंदूरमधील इंजिनिअरने आरोप केला की एक महिला त्याच्याशी जवळीक वाढवून त्याला ब्लॅकमेल करत आहे. या महिनेने काही व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेला ताब्यात घेतले आणि या देशातील सर्वात मोठ्या सेक्स स्कँडलचे बिंग फुटले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...