'या' पोलीस निरीक्षकाची ८ महिन्यांत तब्बल ११ वेळा बदली

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 01, 2019 | 16:24 IST | IANS

पोलीस कर्मचाऱ्यांची बदली होत असल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण एका पोलीस कर्मचाऱ्याची आठ महिन्यांत तब्बल ११ वेळा बदली झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आश्चर्य वाटतयं ना? पण असं खरोखर झालं आहे.

Police
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • पोलीस निरीक्षकाचे आठ महिन्यांत ११ वेळा बदलीचे आदेश
  • वारंवार बदलीमुळे पोलीस निरीक्षक वैतागले
  • पोलीस निरीक्षकाची न्याय मिळावा यासाठी हायकोर्टात धाव

भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. येथे असे एक पोलीस अधिकारी आहेत ज्यांची आठ महिन्यांत चक्क ११ वेळा बदली करण्यात आली आहे. या वारंवार होणाऱ्या बदलीमुळे त्रस्त झालेल्या पोलीस निरीक्षक सुनिल लाटा यांनी जबलपूर उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अशाप्रकारे एकाच अधिकाऱ्याची कमी वेळेत अधिक वेळा बदली करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी.

सध्या मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील सारणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुनिल लाटा यांची निवाडी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. या बदलीनंतर पोलीस निरीक्षक सुनिल लाटा यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. सुनिल लाटा यांनी या प्रकरणी जबलपूर उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

असं म्हटलं जात आहे की, मध्यप्रदेशात आठ महिन्यांपूर्वी सत्ताबदल झालं आहे आणि त्यानंतर पोलीस निरीक्षक सुनिल लाटा यांच्या बदलीचा सिलसिला सुरू झाला. सुनिल लाटा यांची पहिल्यांदा बदली बैतूल येथून आयजी ऑफिस होशंगाबाद येथे करण्यात आली. त्यानंतर होशंगाबाद येथून पोलीस मुख्यालयात त्यांची बदली करण्यात आली. नंतर पोलीस मुख्यालयातील आदिवासी कल्याण शाखेत त्यांची बदली केली. मग पुन्हा त्यांची बदली बैतूल येथील आदिवासी कल्याण शाखेत पाठवण्याचे आदेश आले.

पोलीस निरीक्षक सुनिल लाटा यांच्या बदलीचा सिलसिला येथेच थाबंला असता तर ठिक होतं. पण पुन्हा त्यांची बदली सागर आणि छतरपूर येथे करण्यात आली. तेथील कार्यकाळ हातात घेताच पुन्हा त्यांची बदली भोपाळ येथे करण्यात आली. मग भोपाळहून पुन्हा बैतूल येथे बदलीचे आदेश आले. कोतवालीचे ते पोलीस स्टेशन इंचार्ज होते आणि मग पुन्हा सारणी पोलीस ठाण्यात त्यांना पाठवलं. सारणी पोलीस ठाण्यात सात दिवस होण्यापूर्वीच परत त्यांची बदली झाली आणि निवाडा जिल्ह्यात पाठवण्यात आलं. 

वारंवार होणाऱ्या या बदलीमुळे त्रस्त झालेल्या पोलीस निरीक्षक सुनिल लाटा यांनी ३० ऑगस्ट रोजी या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली. सुनिल लाटा यांनी आयएनएस या न्यूज एजन्सीला सांगितले की, गेल्या आठ महिन्यांत त्यांची ११ वेळा बदली करण्यात आली. त्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...