विवाहबाह्य संबंधाचा जाब विचारला म्हणून पतीने रस्त्यातच केली पत्नीला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

लोकल ते ग्लोबल
Updated Feb 12, 2020 | 16:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

मध्य प्रदेशमध्ये एका पतीने पत्नीला भररस्त्यात मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ही घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे.

Madhya pradesh police official assaulted his wife in public video viral
विवाहबाह्य संबंधाचा जाब विचारला म्हणून पतीने रस्त्यातच केली पत्नीला मारहाण, व्हिडिओ व्हायरल  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मध्य प्रदेशमध्ये एका पतीने पत्नीला भररस्त्यात मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
  • धक्कादायक म्हणजे मारहाण करणारा हा पती स्वत: पोलीस कर्मचारी आहे.
  • या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका महिलेला अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे.

मध्य प्रदेश: पती-पत्नीच्या वादाचे कारण काय असू शकते याचा अंदाज लावता येत नाही. अनेकदा विवाहबाह्य संबंध किंवा इतर कारणांमुळे जोडप्यांमध्ये बरेच खटके येतात. मग एकमेकांना जाबही विचारले जातात. मात्र काहीवेळी याचा परिणाम फारच वाईट होतो. मध्य प्रदेशमध्ये एका पतीने पत्नीला भररस्त्यात मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ही घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. धक्कादायक म्हणजे मारहाण करणारा हा पती स्वत: पोलीस कर्मचारी आहे.

मध्य प्रदेशमध्ये एक हैराण करणारा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ धार जिल्ह्यातील आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका महिलेला अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे. महिलेला मारहाण करणारा हा व्यक्ती पोलीस कर्मचारी आहे. गंधवानी पोलीस स्टेशनचा इन्चार्ज असलेला नरेंद्र सूर्यवंशी या व्यक्तीने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीचे कारण होते ते म्हणजे पत्नीने पतीला त्याच्या अनैतिक संबंधांविषयी जाब विचारला होता.

मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची तपासणी केली जात आहे. तसेच नरेंद्र सूर्यवंशी याला डिस्ट्रिक्ट लाइन्समध्ये पाठवले गेले आहे. व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे त्याने आधी महिलेला खेचत नेले आणि तिच्या केसांना धरून तिला ओढले.

सूर्यवंशी याची पत्नी आणि मुलगा इंदौरमध्ये राहणारे आहेत. त्याच्या पत्नीला आपला पती गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एका मुलीसोबत ठाणे प्रभारीच्या क्वार्टर्समध्ये राहत असल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर पत्नी आणि मुलगा दोघांनीही थेट क्वार्टर्स गाठले. तिथे पोहोचल्यावर त्याच्या रूमचा दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर पत्नीने तिथेच गदारोळ घालण्यास सुरूवात केली. गोंधळ सुरू केल्यानंतर परिसरातील लोक तिथे जमले. त्यानंतर अचानक सूर्यवंशी बाहेर येत त्याने पत्नीशी भांडायला सुरूवात करत तिला मारहाण सुरू केली.

काही वेळानंतर त्याठिकाणी पोलीस आल्यावर तिथले वातावरण शांत केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या पत्नीने आपल्या पतीने दुसऱ्या मुलीशी विवाह करून तो तिच्यासोबत राहत असल्याचा आरोप केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...