ST चा भीषण अपघात, बस पुलावरून कोसळून 13 जणांचा मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर

Madhya Pradesh Bus Accident: नदीतून आतापर्यंत 13 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर 15 जणांचा सुखरूप बाहेर काढलं आहे. सकाळी 10 वाजता हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Madhya Pradesh bus accident
मध्य प्रदेशमध्ये भीषण बस अपघात  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) आज एक मोठा बस अपघात झाला आहे.
  • मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेली बस नर्मदा नदीत (Narmada River) कोसळली.
  • या दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

 मध्य प्रदेश: मध्य प्रदेशात (Madhya Pradesh)  आज एक मोठा बस अपघात झाला आहे. मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेली बस नर्मदा नदीत (Narmada River)  कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. नदीतून आतापर्यंत 13 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर 15 जणांचा सुखरूप बाहेर काढलं आहे. सकाळी 10 वाजता हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह 50 हून अधिक जण प्रवास करत होते. 

आतापर्यंत 13 जणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्यात आली आहे. पुलाचे रेलिंग तोडून बस थेट 25 फूट खाली नदीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.
 

अधिक वाचा-  राज्यात पावसाचं धुमशान सुरूच, अतिवृष्टीचे 104 बळी; 275 गावांना पुराचा फटका

पुलाचा कठडा तोडून एसटी नर्मदा नदीत कोसळली. तांत्रिक बिघाडामुळे एसटी पुलावरून कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. अपघातग्रस्त एसटी बस अमळनेर आगाराची असल्याचं समजतंय. तसंच इंदूरहून अमळनेरकडे जात असताना हा अपघाता झाला आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, इंदूरहून महाराष्ट्राकडे जाणारी प्रवासी बस खलघाट संजय सेतू पुलावरून 25 फूट खाली नदीत पडली. धामनोद पोलीस आणि खलटाका पोलीस घटनास्थळी बचावकार्य राबवत आहेत. NDRF ची टीमही मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहे. इंदूरचे आयुक्त पवन कुमार शर्मा यांनी धार आणि खरगोनच्या जिल्हाधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत.

या घटनेवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कमलनाथ यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, धार जिल्ह्यातील खलघाट येथे प्रवाशांनी भरलेली बस नर्मदा नदीत पडल्याची दुःखद माहिती मिळाली आहे. युद्धपातळीवर बचावकार्य करून जनतेला दिलासा देण्याचे काम करता येईल, अशी माझी शासन आणि प्रशासनाकडे मागणी आहे.

इंदूरला महाराष्ट्राला जोडणाऱ्या पुलावर अपघात

आग्रा-मुंबई (एबी रोड) महामार्गावर हा अपघात झाला. हा रस्ता इंदूरला महाराष्ट्राला जोडतो. घटनास्थळ इंदूरपासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. संजय सेतू पूल ज्यावरून बस पडली तो धार आणि खरगोन या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेला आहे. अर्धा भाग खलघाट (धार) मध्ये आणि अर्धा भाग खलटाका (खरगोन) मध्ये आहे. खरगोनचे जिल्हाधिकारी आणि एसपीही घटनास्थळी पोहोचले आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी