Jantar Mantar Kisan Mahapanchayat: दिल्लीच्या (Delhi) जंतर-मंतरवर (Jantar Mantar) आज शेतकऱ्यांची (Farmers) महापंचायत (Maha Panchayat ) होणार आहे, मात्र पोलिसांनी राजधानी बाहेरून आलेल्या शेतकऱ्यांना परवानगी दिलेली नाही. जे शेतकरी दिल्लीत आले आहेत तेच जंतरमंतरवर जाऊ शकतात, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तर तेथे जास्त लोक जमणार नाहीत असेही त्यांनी सांगितले आहे.
युनायटेड किसान मोर्चाच्या (United Kisan Morcha) बॅनरखाली अनेक शेतकरी संघटना सरकारच्या आश्वासनाविरोधात आज सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत जंतरमंतरवर धरणे आंदोलन करणार आहेत. त्याचवेळी केंद्रीय कृषी मंत्रालयाने (Union Ministry of Agriculture) स्थापन केलेल्या एमएसपी समितीची पहिली बैठकही आज सकाळी 10.30 वाजता होणार आहे.टिकरी सीमेवरून शेतकऱ्यांना राजधानीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कडक व्यवस्था केली आहे. सीमेवर अनेक पोलीस ठाण्याचे बॅरिकेड्स आणि पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. युनायटेड किसान मोर्चाचे पदाधिकारी अभिमन्यू कोहर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, शेतकरी अनेक प्रश्नांवर जंतरमंतरवर महापंचायत घेत आहेत.
Read Also : धनश्रीला घरात वावरणही का झालं कठीण; जाणून घ्या काय आहे कारण
या घटनेसंदर्भात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांना अटक करावी, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील टिकुनिया घटनेतील शेतकरी कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, तुरुंगात असलेल्या शेतकर्यांची सुटका करावी आदी मागण्या महापंचायतीच्या मुद्द्यांमध्ये आहेत. मात्र, टिकुनिया प्रकरणातील मुख्य आरोपी टेनीचा मुलगा आशिष मिश्रा अजूनही तुरुंगातच आहे.
Read Also : Maharashtra Monsoon Session : अधिवेशनाचा तिसरा दिवसही गाजणार
याशिवाय स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीच्या आधारे एमएसपी हमी कायदा लागू करावा, भारतातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, 2022 ची वीजबिल रद्द करावी, उसाच्या आधारभूत किंमतीत वाढ करावी आणि थकबाकी द्यावी, अशा मागण्या शेतकरी करत आहेत. आंदोलनादरम्यान तात्काळ, शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे करावेत, पंतप्रधान फसल विमा योजना आणि अग्निपथ योजनेंतर्गत शेतकर्यांना नुकसान भरपाई देणे आदी मुद्द्यांवर शेतकरी एकत्र येत आहेत.