श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास हॉस्पिटलमध्ये, प्रकृती गंभीर

Mahant Nritya Gopal Das President of Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust hospitalized condition critical : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांना रविवारी दुपारी साडेबारा वाजता लखनऊच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर आहे.

Mahant Nritya Gopal Das President of Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust hospitalized condition critical
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास हॉस्पिटलमध्ये, प्रकृती गंभीर  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास हॉस्पिटलमध्ये, प्रकृती गंभीर
  • मेदांता हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअर विभागात उपचार घेत आहेत
  • राम मंदिराच्या कामाच्या नियोजनाचे नेतृत्व ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून महंत नृत्य गोपाल दास करतात

Mahant Nritya Gopal Das President of Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust hospitalized condition critical : लखनऊ : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांना रविवारी दुपारी साडेबारा वाजता लखनऊच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर आहे. महंत नृत्य गोपाल दास मेदांता हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअर विभागात उपचार घेत आहेत. 

अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीचे काम जोरात सुरू आहे. या कामाच्या नियोजनाचे नेतृत्व श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्यावतीने महंत नृत्य गोपाल दास करत आहेत. याआधी नोव्हेंबर २०२० मध्ये श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे त्यांच्यावर उपचार करावे लागले होते. तसेच ऑक्टोबर २०२१ मध्ये कोरोना झाल्यामुळे काही काळ त्यांना लखनऊच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी