RTPCR Test New Rates । कोरोना चाचणीचे दर झाले कमी, जाणून RTPCR चाचणीचे नवे दर

राज्य शासनाने खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा केली आहे.  RTPCR Test New Rates in Maharshtra

RTPCR Test New Rates
शासन निर्णयही जाहीर. 
थोडं पण कामाचं
  • सुधारित दरामुळे कोरोना चाचणी आणखी स्वस्त झाली आहे.
  • कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात आले आहेत.
  • आरोग्य विभागाने या संदर्भात शासन निर्णयही जाहीर केला आहे.

RTPCR Test New Rate:  मुंबई : राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणार्‍या कोरोना चाचण्यांचे दर सुधारित करण्यात आले आहेत. सुधारित दरामुळे कोरोना चाचणी आणखी स्वस्त झाली आहे. आरटीपीसीआर चाचणेसाठी आता खासगी प्रयोगशाळेत ३५० रुपये शुल्क आकारण्यात येतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आरोग्य विभागाने या संदर्भात शासन निर्णयही जाहीर केला आहे.

maharahstra government reduce price of corona and rtpcr test

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा केली आहे.  आता नव्या सुधारित दरानुसार केवळ ३५० रुपयांत  चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

शासनाच्या निर्णयानुसार आता कोरोना चाचण्यांसाठी ३५०, ५०० आणि  ७०० रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरुन नमूने घेऊन त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून ३५० रुपये आकारणे खासगी प्रयोगशाळेसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. रुग्णालय, कोविड केअर सेंटर, कॉरंटाईन सेंटर मधील प्रयोगशाळा येथून नमूना तपासणी आणि अहवाल यासाठी ५०० रुपये तर रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमूना घेऊन त्याचा अहवाल देणे यासाठी ७०० रुपये आकारण्यात येणार आहेत. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, असे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. हे दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित नमूने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जाऊन नमूने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत.

अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी २००, २५० आणि ३५० असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी ३००, ४००, ५०० असे दर निश्चित करण्यात आले आहेत. रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास १००, १५० आणि २५० असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत.

सीबी-नैट अथवा ट्रूनैट चाचणीसाठी १२०० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. या चाचण्यांसाठी आवश्यक साहित्य आणि साधनसामुग्री माफक दरात उपलब्ध होत असल्याने तसेच आयसीएमआरने विविध उत्पादक कंपन्यांना मान्यता दिल्याने त्यांची उपलब्धता वाढली आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत असल्याने त्यावरील खर्च देखील कमी झाला आहे. परिणामी खासगी प्रयोगशाळांना येणारा तपासणी खर्च कमी झाल्याचे नमूद करतानाच राज्यात आयसीएमआर आणि एनएबीएलने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळांच्या संख्येत वाढ झाल्याने चाचण्यांचे दर कमी होणे आवश्यक असल्याने राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी