सुट्या सिगारेट, विडीवर बंदी घालणारे महाराष्ट्र ठरले पहिले राज्य

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 28, 2020 | 14:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Maharashtra: आरोग्य विभागाचे म्हणणे आहे की जेव्हा लोक सुट्या सिगारेट अथवा विडी खरेदी करतात तेव्हा पाकिटावरील सावधानतेचा इशारा पाहत नाहीत. त्यामुळे या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 

tobacco
सुट्या सिगारेट, विडीवर बंदी घालणारे महाराष्ट्र पहिले राज्य 

थोडं पण कामाचं

  • गुरूवारी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाकडून(Health department) याबाबत माहिती देण्यात आली.
  • सरकारच्या या ऑर्डरमुळे तरूणांमध्ये स्मोकिंगची सवय कमी होईल.
  • जगभरात तंबाखूसारख्या उत्पादनांमुळे दरवर्षी ८० लाख लोकांचा मृत्यू होतो.

मुंबई: महाराष्ट्र (Maharashtra) हे सुट्या सिगारेट तसेच विडीवर बंदी घालणारे पहिले राज्य ठरले आहे. गुरूवारी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाकडून(Health department) याबाबत माहिती देण्यात आली. यात म्हटले आहे की कायद्यानुसार सिगारेट तसेच विडीसह(Cigarette) सर्व तंबाखू उत्पादनांच्या पाकिटावर  आरोग्यासंबंधी सावधानतेचा इशारा लिहिणे गरजेचे आहे. 

सिगारेट आणि दुसरी तंबाखू उत्पादने((Tobacco Products)च्या जाहिराती आणि खरेदी विक्री थांबवण्यात आली आहे. २००३च्या कायद्यानुसार राज्यात सुटया सिगारेट आणि विडीच्या विक्रीवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. हे सर्कुलर आरोग्य विभागाच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी प्रदीप व्यास यांच्याकडून जारी करण्यात आले आहे. 

सुट्या सिगरेट खरेदी केल्यास दिसत नाही इशारा

आरोग्य विभागाचे म्हणणे हे की जेव्हा लोक सुट्या सिगारेट अथवा विडी खरेदी करतात तेव्हा पाकिटावरील ते सावधानतेचा इशारा पाहू शकत नाहीत. स्मोकिंग केल्याने कॅन्सर तसेच इतर आरोग्यासंबंधी आजार होतात. त्यामुळे सरकारने सुट्या सिगारेट, विडीच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 

टाटा मेमोरियमल रुग्णालयाचे कॅन्सर सर्जन डॉक्टर पंकज चर्तुवेदी यांचे म्हणणे आहे की सरकारच्या या ऑर्डरमुळे तरूणांमध्ये स्मोकिंगची सवय कमी होईल. भारतात १६ ते १७ वर्षाच्या तरुण मुलांमध्ये स्मोकिंगचे प्रमाण सर्वाधिकआहे. त्यांच्याकडे जास्त पैसे नसल्याने हे तरूण पाकिट खरेदी करण्याच्या ऐवजी सुट्या सिगारेट विकतात. सुट्या सिगारेट खरेदी करणाऱ्यांनाही तंबाखू उत्पादनांवर लावला जाणाऱ्या टॅक्सचीही चिंता नसते. 

सुट्या सिगारेट घेणाऱ्यांना नसते टॅक्सचे टेन्शन

नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार १० टक्के टॅक्स वाढवल्यास स्मोकिंग करणाऱ्यांची संख्या ८ टक्के कमी झाली आहे. जर लोकांनाच एकच सिगारेट खरेदी करण्याचे स्वातंत्र असते तर त्यांना जास्त टॅक्सचा त्रास कधीही समजणार नाहीत. ग्लोबल टोबॅको युथ सर्व्हे २०१६ननुसार महाराष्ट्रात स्मोकिंगचा दर देशात सर्वात कमी आहे. 

जगभरात तंबाखूसारख्या उत्पादनांमुळे दरवर्षी ८० लाख लोकांचा मृत्यू होतो. यात ७० लाख मृत्यू सरळ सरळ तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींचा होतो. तर स्मोकिंग करणाऱ्यांच्या जवळ वावरल्याने दरवर्षी १२ लाख लोक आपला जीव गमावतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी