GST Collection : एप्रिल महिन्यात उच्चांकी जीएसटी महसूल संकलन, जीएसटी संकलनात महाराष्ट्र एक नंबर

एप्रिल २०२२ मध्ये देशात उच्चांकी जीएसटी महसूल संकलन झाला आहे. या सगळ्यात पुन्हा महाराष्ट्रात सर्वाधिक जीएसटी संकलन झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल २५ टक्के इतकी आहे. 

GST Collection
जीएसटी संकलन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एप्रिल २०२२ मध्ये देशात उच्चांकी जीएसटी महसूल संकलन झाला आहे.
  • या सगळ्यात पुन्हा महाराष्ट्रात सर्वाधिक जीएसटी संकलन झाला
  • गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल २५ टक्के इतकी आहे. 

GST Collection : नवी दिल्ली : एप्रिल २०२२ मध्ये देशात उच्चांकी जीएसटी महसूल संकलन झाला आहे. या सगळ्यात पुन्हा महाराष्ट्रात सर्वाधिक जीएसटी संकलन झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल २५ टक्के इतकी आहे.  (maharashtra collects highest gst in india with 25 percent growth compare last economic year)

एप्रिल 2022 मध्ये एकत्रित जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवाकर महसूल संकलन 1,67,540 कोटी रुपये इतके झाले आहे. यात सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 33,159 कोटी, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 41,793 कोटी, आयजीएसटी म्हणजेच एकात्मिक वस्तू आणि सेवा करापोटी 81,939 कोटी  (माल आयातीवर संकलित केलेल्या रु. 36,705 कोटींसह) आणि उपकर 10,649 कोटी रुपये  यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात २२ हजार १३ कोटी जीएसटी संकलन झाला होता. त्यात २५ टक्क्यांनी वाढ होऊन या वर्षी एप्रिलमध्ये राज्यातून २७ हजार ४९५ कोटी रुपयांचा जीसटी संकलन झाले आहे. यंदाही महाराष्ट्र जीएसटी संकलनात सर्वप्रथम आहे. 

एप्रिल 2022 मध्‍ये झालेले सकल जीएसटी  संकलन हे आतापर्यंतचे सर्वाधिक जीएसटी महसूल संकलन आहे.  त्या आधीच्या  महिन्यात नोंदवण्यात आलेल्या 1,42,095 कोटी रुपये जीएसटी संकलनाच्या तुलनेत एप्रिल महिन्यातील जीएसटी संकलन 25,000 हजार कोटी रुपयांनी अधिक आहे.

सरकारने समझोत्याच्या स्वरूपात आयजीएसटीमधून सीजीएसटीला  33,423 कोटी रुपये  आणि  सीजीएसटीला  26962 कोटी रुपये चुकते केले आहेत.

नियमित समझोत्यानंतर  एप्रिल 2022 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी   66,582 कोटी रुपये आणि एसजीएसटी साठी 68,755 कोटी रुपये आहे.

एप्रिल 2022 चा जीएसटी  महसूल हा  मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 20% जास्त आहे.या महिन्यात, मालाच्या आयातीतून मिळणारा महसूल 30% अधिक नोंदवण्यात आला. आणि देशांतर्गत व्यवहारातून मिळणारा महसूल (सेवांच्या आयातीसह) हा गेल्या वर्षी  याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 17% अधिक आहे.

सकल जीएसटी संकलनाने प्रथमच 1.5 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.मार्च 2022 मध्ये निर्माण एकूण ई-वे देयकांची  संख्या 7.7 कोटी होती, जी फेब्रुवारी 2022 मध्ये निर्माण  झालेल्या 6.8 कोटी ई-वे देयकांपेक्षा  13% ने अधिक आहे,ही वाढ व्यावसायिक व्यवहार वेगाने पूर्वपदावर येत असल्याचे प्रतिबिंबित करते.

एप्रिल 2021. मध्ये दाखल केलेल्या एकूण 92  लाख विवरणपत्रांच्या तुलनेत. एप्रिल 2022 मध्ये, जीएसटीआर -3बी  मध्ये 1.06 कोटी जीएसटी विवरणपत्र  भरण्यात आली  त्यापैकी 97 लाख विवरणपत्र मार्च 2022 या  महिन्याशी संबंधित आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी