Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत धावपळीत नितीन राऊत पडले, डोळ्याला अन् कपाळाला दुखापत

Nitin Raut fell down during Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा सुरू असताना धावपळीत काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत हे खाली कोसळले. नितीन राऊत यांना दुखापत झाली आहे.

Maharashtra Congress leader nitin raut injured after fell down during bharat jodo yatra in hyderabad read in marathi
Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत धावपळीत नितीन राऊत पडले, डोळ्याला अन् कपाळाला दुखापत  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • भारत जोडो यात्रेत झालेल्या धावपळीत नितीन राऊत कोसळले
  • नितीन राऊत यांच्या डोक्याला आणि डोळ्याला दुखापत
  • नितीन राऊत यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू

Nitin Raut fell down during Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. विविध राज्यांत सुरू असलेल्या या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक नेते सहभागी झाले आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा हैदराबाद येथे सुरू असताना झालेल्या धावपळीत काँग्रेस नेते नितीन राऊत हे पडले. (Maharashtra Congress leader nitin raut injured after fell down during bharat jodo yatra in Hyderabad read in marathi)

खूपच गर्दी आणि त्यानंतर झालेल्या धावपळीत नितीन राऊत हे पडले. नितीन राऊत यांच्या डोळ्याला आणि कपाळाला दुखापत झाली आहे. तसेच पायालाही मुका मार लागला असल्याची माहिती समोर आली आहे. या दुखापतीनंतर नितीन राऊत यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे पण वाचा : 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत स्वस्त आणि मस्त फोन

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा विविध राज्यांतून जात आहे. केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा येथे ही पदयात्रा झाली. गेल्या 54 दिवसांपासून ही पदयात्रा सुरू आहे. या पदयात्रेला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. काश्मीर ते कन्याकुमारी अशी निघालेली ही भारत जोडो यात्रा येत्या 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात येणार आहे.

राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा ही हैदराबाद येथे सुरू असताना मोठी गर्दी झाली होती. या पदयात्रेत काँग्रेस नेते, कार्यकर्ते यांच्यासह अनेक नागरिकही सहभागी झाले होते. राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत चालत असताना कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली या गर्दीतून वाट काढत असताना माजी मंत्री नितीन राऊत हे खाली कोसळले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी