Maharashtra govt formation: राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचावर आज दिल्लीत खलबतं, बैठकीची वेळ निश्चित

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी आता दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीची मंगळवारी रद्द झालेली बैठक बुधवारी म्हणजेच आज होणार आहे.

ncp CONGRESS meeting
आज दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त बैठक  

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी आता दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
  • राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारची स्थापना अजूनही संशयाच्या भोवऱ्यातच आहे.
  • काँग्रेस राष्ट्रवादीची मंगळवारी रद्द झालेली बैठक बुधवारी म्हणजेच आज होणारेय.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी आता दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र तरीही राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारची स्थापना अजूनही संशयाच्या भोवऱ्यातच आहे. काँग्रेस राष्ट्रवादीची मंगळवारी रद्द झालेली बैठक बुधवारी म्हणजेच आज होणारेय. संध्याकाळी ५ वाजता ही बैठक होईल. दरम्यान ही बैठक मंगळवारी होणार होती.  मंगळवारी दुपारच्या सुमारास काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांची  बैठक रद्द झाल्याची बातमी समोर आली. 

काँग्रेसच्या राज्यातील प्रमुख नेत्यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत चर्चा केली. काँग्रेस नेते अहमद पटेल, ए.के. अँटोनी, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे या नेत्यांनी मंगळवारी सोनिया गांधी यांची भेट घेऊन चर्चा केली. 

मंगळवारी देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची जयंती होती. त्यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. बरेच काँग्रेसचे नेते तिकडे व्यस्त असतील म्हणून बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.  

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, सुनील तटकरे हे नेते उपस्थित असणार आहेत. काँग्रेसकडूनही केंद्रातील आणि राज्यातील महत्त्वाचे नेते बैठकीसाठी हजर असतील, अशी माहिती सुनिल तटकरे यांनी दिली आहे.  काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाल, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे आणि विजय वडेट्टीवार उपस्थित असतील. या बैठकीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा होईल आणि पुढील रणनीती निश्चित करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

शरद पवारांची गुगली

शरद- सोनिया यांच्यात सोमवारी बैठक पार पडली. दोघांमध्ये जवळपास जवळजवळ ५० मिनिटं चर्चा झाली. या चर्चेनंतर पवारांनी पत्रकार परिषद घेऊन या बैठकीत नेमकं काय झालं याबाबत माहिती दिली. या बैठकीत काही तरी महत्त्वाच्या निर्णय घेतला जाईल अशीच सर्वांची अटकळ होती. पण पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी एक वेगळीच गुगली टाकली. 'राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत सोनिया गांधी यांना माहिती दिली. या बैठकीत शिवसनेबाबत काहीही चर्चा झाली नाही. सत्तास्थापनेबाबतही चर्चा झाली नाही.' असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी