गडकरी आणि पटेलांची दिल्लीत चर्चा, यासाठी घेतली भेट, पटेलांचं स्पष्टीकरण

काँग्रेसचे चाणक्य अशी ओळख असलेले अहमद पटेल यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. पटले हे आज सकाळीच गडकरींच्या निवासस्थानी दाखल झाले. या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. 

Ahmed patel
यासाठी गडकरींची घेतली भेट, पटेलांचं स्पष्टीकरण  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • काँग्रेसचे चाणक्य अशी ओळख असलेले अहमद पटेल यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे
  • पटेल हे आज सकाळीच गडकरींच्या निवासस्थानी दाखल झाले.
  • या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. 

राज्यातल्या सत्तास्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेवरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच राजधानी दिल्लीतही या घडामोडींचा परिणाम पाहायला मिळतो. कारण काँग्रेसचे चाणक्य अशी ओळख असलेले अहमद पटेल यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. पटेल हे आज सकाळीच गडकरींच्या निवासस्थानी दाखल झाले. या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. 

या चर्चेनंतर अहमद पटेल यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला गेला. त्यानंतर आपण शेतकरी आणि रस्त्याच्या प्रश्नावर नितीन गडकरी यांची भेट घेतल्याचं पटेलांनी सांगितलं. देशात अपघात होत आहेत, यावर माहिती देण्यासाठी आलो होतो. ही राजकीय भेट नव्हती. महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नाही, महाराष्ट्राचा म सुद्धा काढला नसल्याचं पटेलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. 

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणावरून त्यांच्यामध्ये चर्चा झाली. तसंच सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी नितीन गडकरी यांचीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

अहमद पटेल हे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे उजवे हात म्हणून ओळखले जातात. सोनिया यांचे ते निकटवर्तीय आहेत. सोनिया यांच्यानंतर ते पक्षातील दुसऱ्या क्रमाकांचे नेते आहेत. बऱ्यापैकी सगळेच निर्णय त्यांच्या सल्ल्यानं घेतले जातात. सोनिया गांधी यांना राजकारणात स्थिरावण्यासाठी पटेल यांनी मोठी मदत केली आहे. अहमद पटेल हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळापासून पक्षात आहेत. 1977 मध्ये काँग्रेस तोंडघशी पडलेली असताना संसदेत पोहचणाऱ्या मोजक्या काँग्रेस खासदारांमध्ये पटेलांचा समावेश होतो. अहमद पटेल हे तीन वेळा लोकसभेवर, तर चार वेळा राज्यसभेवर खासदारपदी निवडून आलेत.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी