Maharashtra-Karnataka border dispute: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

Maharashtra-Karnataka border dispute : महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra-Karnataka)राज्यातील सीमाभागात वातावरण तापलं होतं. या भागात भडकलेला हिंसाचार थांबण्याची चिन्हे आहेत. या दोन राज्यांमधील सीमावादाबाबत बुधवारी, 14 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री (Chief Minister)बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले.

border dispute: Union Home Minister Amit Shah talks with Chief Ministers of both states
सीमावाद-अमित शहा दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • महाविकास आघाडीच्या दहा खासदारांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सकाळी सव्वाअकराला अमित शहा यांची भेट घेतली.
  • एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे आणि धैर्यशील माने यांना विरोध
  • अमित शहा दोन्ही मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून ही चर्चा करण्याची शक्यता

Maharashtra-Karnataka border dispute: नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra-Karnataka)राज्यातील सीमाभागात वातावरण तापलं होतं. या भागात भडकलेला हिंसाचार थांबण्याची चिन्हे आहेत. या दोन राज्यांमधील सीमावादाबाबत बुधवारी, 14 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री (Chief Minister)बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री(Union Home Minister )अमित शहा ( Amit Shahयांनी शुक्रवारी महाविकास आघाडीच्या खासदारांना दिले.  (Maharashtra-Karnataka border dispute: Union Home Minister Amit Shah talks with Chief Ministers of both states)

अधिक वाचा  : मुंबई प्रदूषणाच्या विळख्यात, दिल्लीपेक्षा परिस्थिती वाईट

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या खासदारांनी याप्रकरणी अतिशय आक्रमक भूमिका घेतली. यावरील पहिले पाऊल म्हणून महाविआच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या दहा खासदारांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सकाळी सव्वाअकराला अमित शहा यांची त्यांच्या संसद भवनातील कार्यालयात भेट घेतली.

अधिक वाचा  : रासायनिक खतांमध्ये भेसळ करणाऱ्या दुकानाला सील

या शिष्टमंडळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत, राजन विचारे, प्रियांका चतुर्वेदी, ओम राजे निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे, फौजिया खान, वंदना चव्हाण, काँग्रेसच्या रजनी पाटील आणि बाळू धानोरकर या खासदारांचा समावेश होता. दरम्यान, ‘मविआ’च्या खासदारांसोबत एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे आणि धैर्यशील माने हेही अमित शहा यांच्या भेटीसाठी त्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचले होते. मात्र, उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांनी तीव्र आक्षेप घेतल्यामुळे त्यांना परत जावे लागले.

अधिक वाचा  :   'फुले, आंबेडकरांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली'

कर्नाटक सरकारकडून बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी आणि बिदरमध्ये राहणाऱ्या मराठी भाषिकांवर अत्याचार होत आहे.  त्या भागात निर्माण झालेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नात हस्तक्षेप करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने शहा यांच्याकडे केली.  शहा यांनी खासदारांची मागणी शांतपणे ऐकून घेतली आणि सीमावादासंदर्भात दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचा विश्वास अमित शहा यांनी या शिष्टमंडळाला दिला आहे. 

गृहमंत्री अमित शहा यांनी पेटलेल्या सीमाप्रश्नावर ‘मविआ’च्या खासदारांनी दिलेले निवेदन स्वीकारून त्यांचे म्हणणे संवेदनशीलतेने ऐकून घेतले. अमित शहा 14 डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे या भेटीनंतर अमोल कोल्हे यांनी सांगितले. अमित शहा दोन्ही मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून ही चर्चा करण्याची शक्यता कोल्हे यांनी व्यक्त केली.

‘गृहमंत्र्यांकडे राज्याचे सर्वपक्षीय खासदार भेटायला गेलो असतो तर जास्त योग्य ठरले असते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद उफाळून आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून चर्चा करायला हवी होती,’ असे  सुप्रिया सुळे म्हणाल्या. ‘आधी जेव्हा अशा घटना घडल्या त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले. मात्र, विद्यमान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन राज्याच्या हितासाठी कोणतीही कृती करताना दिसत नाहीत. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विरोधात बोलत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याचा प्रतिवाद केला नाही,’ असा आरोप सुळे यांनी केला.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी