महाराष्ट्रात लवकरच कडक लॉकडाऊन लागणार, मुख्यमंत्री घोषणा करणार ?

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 20, 2021 | 20:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राज्यात कडक लॉकडाऊन लावला जाणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

CM Uddhav Thackeray to announce complete lockdown in Maharashtra
महाराष्ट्रात लागणार कडक लॉकडाऊन 

थोडं पण कामाचं

  • राज्यात कडक लॉकडाऊन
  • मुख्यमंत्री घोषणा करण्याची शक्यता
  • राज्यात कोरोनाचे थैमान

मुंबई : महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागू होण्याची चिन्हे आहेत. देशासह महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. महाराष्ट्रात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे, कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढतच चालला आहे. याचा मोठा ताण आरोग्य यंत्रणेवर पडतो आहे. राज्यातील गंभीर परिस्थिती लक्षात घेता उद्यापासून पुढील १५ दिवस कडक लॉकडाऊन लावला जाणार असल्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

राज्यात कोरोनाचे थैमान


महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. राज्यातील परिस्थिती फारच गंभीर स्वरुपाची आणि चिंता निर्माण करणारी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: थैमान घातले आहे. कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी अधिक कडक निर्बंधांचीच आवश्यकता भासतेय. सरकारने निर्बंध घातल्यावरही नागरिक त्याचे पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे कडक लॉकडाऊनला पर्याय नाही, असेही शिंदे पुढे म्हणाले.

मख्यमंत्री जाहीर करणाऱ्याची शक्यता


'महाराष्ट्रातील कोरोनाची रुग्णसंख्या आणि संसर्ग कमी करण्यासाठी कडक निर्बधांची गरज आहे. कडक लॉकडाऊन लावावा असे जनतेलाच वाटते आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय उपचार, ऑक्सिजन यांचा तुटवडा जाणवतो आहे. महाराष्ट्रात इतर राज्यांमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातोय. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी कडक लॉकडाऊनचाच पर्याय हाती आहे. ऑक्सिजनसाठी प्रकल्प उभारून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय उद्या जाहीर करतील', असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.


राज्याला गरज ऑक्सिजनची


महाराष्ट्रात कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची मोठी आवश्यकता आहे. मात्र सध्या असलेला ऑक्सिजना साठा आणि उत्पादन हे सध्याच्या गंभीर परिस्थितीत पुरेसे नाही. त्यामुळे इतर राज्यांमधूनदेखील ऑक्सिजन महाराष्ट्रात मागवला जातोय. राज्य सरकार ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी प्रयत्न करते आहे. ऑक्सिजन उत्पादनासाठी प्रकल्प उभे करायचे प्रयत्न केले जात आहेत. हवेतील ऑक्सिजनचाच वापर करून ऑक्सिजन तयार करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राज्य सरकारचा स्वत:चाच १०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन क्षमतेचा प्रकल्प असल्यास कोरोनाच्या संकटकाळात त्याचा मोठा उपयोग होऊ शकतो, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.


लॉकडाऊनचा नाईलाज


राज्यातील लॉकडाऊनसंदर्भातील निर्णयाची घोषणा उद्या उद्धव ठाकरे करणार आहेत. ऑक्सिजनचा इतर राज्यांमधील पुरवठा सुरळीत होण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात आली आहेत. लॉकडाऊन हा नाईलाजानेच लावावा लागतोय. मात्र सद्यपरिस्थितीत त्याला पर्याय नाही, असे शिंद म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी