Maharashtra News: NHAIचे 800 कर्मचारी अन् 720 मजदुरांनी चार दिवसात बनवला 75 KMचा महामार्ग; गिनीज बुकमध्ये नोंदवला विक्रम

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highways Authority) (NHAI) आणखी एक यश संपादन केले आहे. NHAI ने अवघ्या 105 तासांत 75 किमी लांबीचा महामार्ग (Highway) बनवून विक्रम केला आहे. NHAI च्या या कामगिरीचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Records) समावेश करण्यात आला आहे. हा महामार्ग अमरावती आणि अकोलाच्या (Amravati and Akola) दरम्यान बनवण्यात आला आहे. 

NHAI built  75 KM highway in 105 hours, became a record
NHAI ने 105 तासात तयार केला 75 KMचा महामार्ग, झाला विक्रम   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • 3 जून रोजी सकाळी महामार्ग बांधण्याची प्रक्रिया सुरू झाली.
  • केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी NHAI चे कौतुक केले आहे.
  • 105 तास 33 मिनिटांत या 75 किमी महामार्गाची बांधणी करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highways Authority) (NHAI) आणखी एक यश संपादन केले आहे. NHAI ने अवघ्या 105 तासांत 75 किमी लांबीचा महामार्ग (Highway) बनवून विक्रम केला आहे. NHAI च्या या कामगिरीचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Records) समावेश करण्यात आला आहे. हा महामार्ग अमरावती आणि अकोलाच्या (Amravati and Akola) दरम्यान बनवण्यात आला आहे. 

या यशाबद्दल केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी NHAI चे कौतुक केले आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून माहितीही दिली आहे. NHAI ने NH-53 वर अमरावती ते अकोला दरम्यान सिंगल लेनमध्ये 75 किमी काँक्रीट रस्ता 105 तास 33 मिनिटांत बांधल्याची माहिती गडकरी यांनी दिली. हा रस्ता राज पथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड आणि जगदीश कदम यांनी बांधला आहे. 

गडकरींनी आपल्या ट्विटमध्ये अनेक छायाचित्रे आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्रही शेअर केले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आझादी का अमृत महोत्सवासह गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड यशस्वीपणे पूर्ण केला. गडकरी म्हणाले की, मी आमच्या अभियंत्यांचे आणि कामगारांचे आभार मानतो, ज्यांनी ही असामान्य कामगिरी करण्यासाठी रात्रंदिवस काम केले. 

akola -amravati

रस्ते बांधणीत अनेक कामगार गुंतले 

हा रस्ता तयार करण्यासाठी 800 कामगार, 720 मजूर आणि अनेक सल्लागारांनी सतत काम केले. या रस्त्याचे काम 3 जून रोजी सकाळी 7.27 वाजता सुरू झाले, जे 7 जून रोजी सायंकाळी 5 वाजता पूर्ण झाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी