Maharashtra Political crisis hearing updates: महाराष्ट्रातील सत्तासंर्षावर सुप्रीम कोर्टात सुरू असलेली सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी आता महिन्याभरानंतर होणार आहे. सत्ता संघर्षाची पुढील सुनावणी आता 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 14 फेब्रुवारीपासून होणारी सुनावणी ही सलग सुनावणी होणार असल्याचं बोललं जात आहे. 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण जाण्याच्या संदर्भातील निर्णयही 14 फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. (Maharashtra political crisis hearing postponed next hearing on February 14 read details in marathi)
Supreme Court to start hearing arguments from February 14 on whether the matter be heard by seven-judge bench or five-judge bench. — ANI (@ANI) January 10, 2023
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी यापूर्वी झालेल्या सुनावणीत हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यामुळे या मुद्यावर सुप्रीम कोर्टात मंगळवारी (10 जानेवारी 023) निर्णय होणं अपेक्षित होते. मात्र, मंगळवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत हे प्रकरणत सात सदस्यीय घटनापीठाकडे देण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे आता 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणीवेळीच सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण जाणार की नाही यावर निर्णय होऊ शकतो.
हे पण वाचा : अलिबागच्या आसपास फिरण्यासारखी प्रसिद्ध निसर्गरम्य ठिकाणे
सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत म्हटलं, आमचं घटनेवर प्रेम आहे. 14 फेब्रुवारीपासून घटनापीठ हे सलग सुनावणी घेणार आहे. आमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. व्हॅलेंटाईन डे चा दिवस आहे ना... मग समजून जा... सर्वकाही प्रेमाने होईल.
सरन्यायाधीश वाय. एस. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर आजची सुनावणी झाली. नबम रेबिया प्रकरणाचा दाखला देत ठाकरे गटाने सत्तासंघर्षाची सुनावणीचं प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्याची मागणी यापूर्वी केली होती. या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू होताच न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली. आता 14 फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.